शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकात मिसळले तणनाशक, अडीच एकरातील धानपीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 22:25 IST

मल्लिक यांनी स्वतःच्या शेतातील धानावर तुडतुडा प्रतिबंधक ट्रॅकर हे कीटकनाशक फवारणी करण्यासाठी आणले होते. पण त्यात ग्लायटोजेन हे तणनाशक मिसळून फवारणी केली. त्यामुळे शेतातील संपूर्ण धान तण नाशकासारखे सुकून जात आहे.  आतापर्यंत हिरवेगार दिसणारे पीक अचानक सुकून जाऊन पिवळे पडत असल्याने मल्लिक यांच्यावर  डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : ढगाळ वातावरणामुळे धान पिकावर आलेल्या तुडतुड्याचा नाश करण्यासाठी आणलेल्या फवारणीच्या औषधीत एका शेतकऱ्याने तणनाशक मिसळले. त्या द्रावणाची धानावर फवारणी करताच ऐन भरीवर असलेले अडीच एकरातील धानपीक सुकून जात असल्याने त्या शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न रंगवत असताना तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा प्रकार जवळच असलेल्या शंकरनगर येथे घडला.हिरामण मल्लिक असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. मल्लिक यांनी स्वतःच्या शेतातील धानावर तुडतुडा प्रतिबंधक ट्रॅकर हे कीटकनाशक फवारणी करण्यासाठी आणले होते. पण त्यात ग्लायटोजेन हे तणनाशक मिसळून फवारणी केली. त्यामुळे शेतातील संपूर्ण धान तण नाशकासारखे सुकून जात आहे. आतापर्यंत हिरवेगार दिसणारे पीक अचानक सुकून जाऊन पिवळे पडत असल्याने मल्लिक यांच्यावर  डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली. 

पीकही जाणार, केलेला खर्चही जाणार

या धान लागवडीसाठी झालेला खर्च, मेहनत पाण्यात जात असल्याने सदर शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. छोट्याशा चुकीमुळे लोंबीला आलेले धानपीक तणनाशकामुळे करपल्यासारखे झाले आहे. यात सदर शेतकऱ्याचे ८० हजार रुपयांचे नुकसान हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे वर्षाचे बजेट काेलमडणार आहे.

शेतात कीटकनाशकाची फवारणी करताना कृषिमित्रांचा, कृषी केंद्र संचालकांचा किंवा कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊनच फवारणी करावी. अन्यथा अंगावरचे सोने गहाण ठेवून, बँकांचे कर्ज घेऊन शेती व्यवसायावर केलेला खर्च पाण्यात जाऊन कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते, हा धडा या घटनेने दिला आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती