दारू विक्रेत्यांना साथ देणाऱ्या पक्षाला मतदान करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:55 PM2019-02-28T12:55:56+5:302019-02-28T12:56:37+5:30
दारूचा पुरवठा करण्यासाठी विक्रेत्यांना साथ देणाऱ्या पक्षांना आम्ही मतदार करणार नाही, असा ठराव तालुक्यातील मुरूमगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या २०० महिलांनी एकमताने मंजूर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये ग्रामीण भागातील मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दारूचा पुरवठा करण्यासाठी विक्रेत्यांना साथ देणाऱ्या पक्षांना आम्ही मतदार करणार नाही, असा ठराव तालुक्यातील मुरूमगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या २०० महिलांनी एकमताने मंजूर केला.
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मतदारांना दारू वाटून त्यांची मते मिळविण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. धानोरा तालुक्यातही हा प्रकार नेहमीच चालतो. तालुक्याच्या सीमावर्ती भागात याचे प्रमाण जास्त असते. मुरूमगाव येथील महिला हा प्रकार नेहमीच अनुभवतात. परंतु आता महिलांनी दारूविक्र ी बंद करण्यासाठी कंबर कसली आहे.
यंदाही प्रचारासाठी गाव पातळीवर बैठका घेताना लोकांना दारूचे आमिष दाखिवण्याचा प्रकार घडण्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी मुरूमगाव येथील महिलांनी मंगळवारी बैठक घेऊन केलेला ठराव राजकीय पक्षांसाठी अडचणीचा ठरणार आहे. त्यामुळे मतदारांना दारूचे प्रलोभन देण्याला आळा बसू शकेल.