ग्रामपंचायत प्रशासनाने वीज बिल भरणा करण्याकरिता २५ मार्चला महावितरण कार्यालयाच्या नावे ७२,३०० रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. जेव्हा वीज कार्यालयाने हा चेक वटविण्यासाठी आपल्या बँक खात्यावर टाकले असता तो चेक बँकेने खात्यात पैसे नसल्याचे कारण दाखवून बाउन्स केला. त्यामुळे हा चेक महावितरण कंपनी शाखा चामोर्शीला परत पाठविण्यात आला. ही माहिती ३१ मार्चला सायंकाळी ५ वाजता ग्रामपंचायत कार्यालय लखमापूर बोरीला कळविण्यात आले. १५ व्या वित्त निधीचे खाते असल्याने खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक असून चेक परत का करण्यात आला ही विचारणा करण्यासाठी चामोर्शी येथील बँकेत ग्रामपंचायत बोरीचे पदाधिकारी गेले. मागील काही दिवसात सलग सुट्ट्या आल्या होत्या तसेच बँकेकडून अनावधानाने चुकी झाली असावी म्हणून आपला चेक बाउन्स झाला असावा, असे व्यवस्थापकाने सांगितले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी बँकेने चेक पास करून वीज बिलाची रक्कम महावितरण कार्यालय शाखा चामोर्शी च्या खात्यात वर्ग करण्यात आली. त्यानंतर वीज वितरण कार्यालयाचे कर्मचारी गावात जाऊन गावांतील पाणीपुरवठा योजनेच्या विजेची जोडणी करून दिली. लगेचच ग्रामपंचायत मधल्या जलमित्रांनी पाण्याची टाकी भरून गावांतील नळ सेवा पूर्ववत करून दिली.
लखमापूर बोरी येथील पाणीपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST