१०९५ शेतकऱ्यांंच्या शेतात पाेहाेचले साैरकृषीपंपाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:54 AM2021-02-23T04:54:15+5:302021-02-23T04:54:15+5:30

गडचिराेली: वीज वापराचा खर्च वाचावा त्याचबराेबर वीज वाहिनी गेलेली नसलेल्या शेतकऱ्यालाही पंप मिळावा यासाठी साैरकृषीपंप देण्याची याेजना शासनाने तीन ...

Water from other agricultural pumps seen in 1095 farmers' fields | १०९५ शेतकऱ्यांंच्या शेतात पाेहाेचले साैरकृषीपंपाचे पाणी

१०९५ शेतकऱ्यांंच्या शेतात पाेहाेचले साैरकृषीपंपाचे पाणी

Next

गडचिराेली: वीज वापराचा खर्च वाचावा त्याचबराेबर वीज वाहिनी गेलेली नसलेल्या शेतकऱ्यालाही पंप मिळावा यासाठी साैरकृषीपंप देण्याची याेजना शासनाने तीन वर्षांपूर्वी सुरू केली हाेती. एक वर्ष या याेजनेचे नियाेजन करण्यातच गेले. त्यानंतर मागील वर्षीपासून साैरकृषीपंप लावण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून जिल्हाभरात १ हजार ९५ शेतकऱ्यांच्या शेतात साैरकृषीपंप लावण्यात आले आहे.सिंचन विहीरी, शेततळे, बंधारे यांच्या माध्यमातून शासनाने सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र पाण्याचा उपसा हाेण्यासाठी साधन असने आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून कृषी पंपासाठी विज जाेडणी दिली जात हाेती. काही शेतकऱ्यांचे शेत मुख्य वीज वाहिनीपासून बऱ्याच दूर अंतरावर राहत असल्याने वीज जाेडणी देणे शक्य हाेत नाही. तसेच बरीचशी वीज कृषी पंपांसाठी वापरली जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध करून दिली जात हाेती. या सर्व अडचणींपासून सुटका करण्यासाठी शासनाने साैरकृषीपंप ही याेजना तीन वर्षांपूर्वी सुरू केली आहे. मागील वर्षीपासून या याेजनेच्या अमंलबजावणीला वेग आला आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात साैरकृषीपंप लावले जात आहेत.

गडचिरेाली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पाणीपातळी वरच आहे. त्यामुळे साैरकृषीपंप चांगले काम करीत आहे. सुरूवातीला साैरकृषीपंप व्यवस्थित पाण्याचा उपसा करणार नाही. अशी शंका शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात हाेती. मात्र प्रत्यक्ष वापर करताना हा पंप विजेवर चालणाऱ्या पंपाप्रमाणेच काम करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे साैरकृृषीपंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे.

बाॅक्स

गडचिराेली जिल्ह्यात फायदेशीर

गडचिराेली जिल्हा जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे नदी, नाल्यांची संख्या अधिक आहे. तसेच जलस्तरही चांगला आहे. मात्र शेतीचे क्षेत्र कमी आहे. तसेच एका शेेतापासून दुसऱ्या शेताचे क्षेत्र बऱ्याच दूर आहे. एका शेतासाठी दाेन ते तीन किमी अंतरावर थ्री-फेज विजेचा पुरवठा करणेही शक्य हाेत नाही. त्यामुळेच बहुतांश शेतकऱ्यांची शेती पडिक असल्याचे दिसून येते. मात्र साैर कृृषीपंप लावल्यास वीजेची गरज पडत नाही. तसेच शेतकऱ्याला विजेचे बीलही येत नाही. पंपाची पाच वर्ष देखभाल ठेवण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर साेपविण्यात आली आहे.

बाॅक्स

अर्ज स्वीकारणे सुरूच

साैर कृषी पंपासाठी अर्जस्वीकारण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागते. शेताजवळ सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे. पाच हेक्टरपर्यंत शेत असल्यास तीन एचपीचा पंप दिला जाते. तर पाच हेक्टरपेक्षा अधिक शेती असल्यास पाच एचपीचा पंप दिला जाते. एससी व एसटीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के तर इतर लाभार्थ्यांना १० टक्के रक्कम भरावी लागते. महावितरणच्या तालुकास्तरावरील कार्यालये तसेच इतरही कार्यालयांमध्ये याबाबतची माहिती उपलब्ध आहे.

तालुकानिहाय बसविलेले साैरकृषीपंप

गडचराेली-१२२

आरमाेरी-२०१

देसाईगंज-९०

काेरची -३७

कुरखेडा-९९

धानाेरा-१२४

अहेरी-१२७

मुलचेरा-५७

एटापल्ली-५३

भामरागड-१३

सिराेंचा-२२

चामाेर्शी-१५०

एकूण-१०९५

Web Title: Water from other agricultural pumps seen in 1095 farmers' fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.