शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी युवकांना व्यवसायासाठी मिळणार कर्ज ! ओबीसी महामंडळ करणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:39 IST

युवकांना स्वयंरोजगाराची संधी : बिनव्याजी कर्ज योजनेची सोय

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत ओबीसी प्रवर्गातील युवक युवतींसाठी विविध योजना उपलब्ध आहेत. या योजनेचा युवक- युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहेत.

महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गासाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता, लघु उद्योग सुरु करण्यासाठी १ लाखाचे बिन व्याजी थेट कर्ज योजना सुरु केली आहे. १. सदर योजनेत नियमित परतफेड न करणाऱ्या लाभार्थीना चार टक्के व्याज आकारण्यात येईल. कर्ज परतफेडीची मुदत ४ वर्ष असणार आहे. 

२० टक्के बिजभांडवल योजनेंतर्गत पाच लाख रूपयांचे कर्ज दिले जाते. कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतुक क्षेत्राशी संबधीत व्यवसाय तसेच पारंपारीक, लघु व सेवा उद्योगासाठी कर्ज देण्यात येते. नावीन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येईल. मंजुर कर्ज रक्कमेच्या पाच टक्के लाभार्थी, २० टक्के महामंडळ व ७५ टक्के बँकेचा सहभाग आहे. महामंडळाच्या कर्ज रक्कमेवर सहा टक्के व्याज दर असुन बँकेच्या कर्ज रक्कमेवर बँकेचा व्याज दर लागु लागु राहील. कर्जाची परतफेड पाच वर्षात करायची आहे. 

वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत १० लाखांपर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केले जाते. अर्जदाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यानंतर व्याजाची रक्कम महामंडळ देईल. कर्ज परतफेडीचा कालावधी बैंक निकषानुसार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, गडचिरोली येथील ओबीसी महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा. 

बचत गटाला उद्योगासाठी मिळणार कर्ज

  • गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत १० ते ५० लाखापर्यंत कर्ज दिले जाते. बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, (कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत) अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बैंक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडुन अदा केला जाईल.
  • नॉन क्रिमीलेअर उमेदवारांच्या गटांकरीता ही सवलत असणार आहे. मंजुर कर्जावर पाच वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल ते कर्ज मंजुर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराच्या आणि १५ लाख रूपये मयदित एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाOBCअन्य मागासवर्गीय जातीGadchiroliगडचिरोलीSmall Businessesलघु उद्योग