शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

लोकरंजन करणारा नंदीबैल झाला गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

सर्व ऋतूंमध्ये थंडी हा सर्वात आल्हाददायक ऋतू समजला जातो. थंडीची चाहूल लागताच विदर्भातील गावखेड्यांमध्ये लोककलांना उत येत होता. गावात दिवाळीच्या दिवशी पहिली दंडार सादर केली जात होती. त्यानंतर दंडारींना प्रारंभ होत होता. दंडारीसोबतच गोंधळ, तमाशा, पांगुळ, गोरखनाथाची कथा आयोजित केल्या जात होत्या.

ठळक मुद्देसंडे अँकर । लोककला धोक्यात; थंडीची चाहूल लागताच सुरू होत होते खेळ

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी धान पिकाच्या कापणी व मळणीला सुरूवात होते. धानाच्या रूपाने लक्ष्मी घरी येण्यास सुरूवात होत असल्याने शेतकऱ्याच्या घरी आनंदाचे वातावरण राहते. याला सुगीचे दिवस असे संबोधल्या जाते. या आनंदाच्या कालावधीत गोसावी समाजाचे लोक गावातील चौकात नंदीबैलाचा खेळ दाखवून शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत करीत होते. खेळानंतर गावात फिरून धान गोळा केले जात होते. यातून नंदीबैल मालक स्वत:चा प्रपंच भागवत होता. मात्र मागील काही वर्षांपासून नंदीबैल गायब झाले आहेत. त्यामुळे नंदीबैलाच्या रूपाने असलेली एक लोककला नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.सर्व ऋतूंमध्ये थंडी हा सर्वात आल्हाददायक ऋतू समजला जातो. थंडीची चाहूल लागताच विदर्भातील गावखेड्यांमध्ये लोककलांना उत येत होता. गावात दिवाळीच्या दिवशी पहिली दंडार सादर केली जात होती. त्यानंतर दंडारींना प्रारंभ होत होता. दंडारीसोबतच गोंधळ, तमाशा, पांगुळ, गोरखनाथाची कथा आयोजित केल्या जात होत्या. याच कालावधीत धानाची कापणी सुरू राहत होती. दिवसभर धान कापणीचे कष्टप्रत काम केल्यानंतरही आबाल वृध्द रात्री होणाऱ्या या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत होते. या कालावधीत शेतकऱ्याकडे पैसा खेळत राहत असल्याने तोही दान व देणगी देण्यास मागेपुढे पाहत नव्हता. मात्र या सर्व लोककला आता लोपपावत चालले असल्याचे दिसून येत आहे.नंदीबैल हा एक लोकरंजन व लोककलेचाच एक प्रकार आहे. शेतकºयाच्या घरी लक्ष्मी येण्यास सुरूवात झाल्याचे चाहूल लागताच नंदीबैलवाल्यांच्या झोपड्या गावाच्या वेशीत धानाच्या बांधीत उभारल्या जायच्या. नंदीबैलवाला आल्याचे आबालवृध्दांना माहित व्हावे, यासाठी ठोक दिली जात होती. काही वेळातच गावकरी जमा होऊन नंदीबैलाच्या खेळाला सुरूवात व्हायची. ज्या महिलेला एक मुलगा, एक मुलगी आहे, अशी माता. गावात नव्याने आलेली सुनबाई कोण? हे ओळखण्याचे आव्हान नंदीबैलाला दिले जात होते. मालकाच्या सूचनांचे पालन करीत नंदीबैल संबंधित महिलेला ओळखत होता. त्यावेळी सर्वच आश्चर्यचकीत होत होते. आता मात्र ही कला लोपपावत चालली आहे. काळाच्या ओघात गोसावी समाजातील नवीन पिढी इतर व्यवसायांमध्ये स्थिरावली आहे. त्यामुळे पुर्वापार चालत आलेली लोककला मागे पडली आहे.मालकाच्या मांडीवर उभा होत होता नंदीबैलगावातील नागरिकांची ओळख करून दिल्यानंतर मालकाच्या मांडीवर उभे राहण्याचा चित्तथरारक खेळ करून दाखविला जात होता. यामध्ये जवळपास पाच क्विंटल वजनचा धष्टपुष्ट नंदीबैल समोरचे दोन्ही पाय मालकाच्या मांडीवर ठेवत होता. तसेच काही प्रमाणात उड्याही मारत होता. पाच क्विंटल वजन मांडीवर ठेवल्यास माणूस जीवंत राहिल काय, याची शाश्वती देणे कठीणच आहे. प्रशिक्षीत असलेला नंदीबैल मागील पुढचे पाय मालकाच्या मांडीवर ठेवताना स्वत:च्या शरीचा जास्तीत जास्त भार मागच्या पायावर ठेवत होता.