शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

एक हजार शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:31 IST

कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकºयाला ३१ मार्च २०१८ पर्यंत उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही सुरू झाली आहे. १ हजार १८४ शेतकºयांची वीज जोडणीसाठी मागणी आहे.

ठळक मुद्देकेवळ १७१ शेतकऱ्यांना लाभ : डेडलाईन संपूनही उच्च दाबाचा पुरवठा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकºयाला ३१ मार्च २०१८ पर्यंत उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही सुरू झाली आहे. १ हजार १८४ शेतकऱ्यांची वीज जोडणीसाठी मागणी आहे. परंतू वर्षभरात केवळ १७१ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे.आजपर्यंत कृषीपंपांना लघुदाब वाहिनीवरून वीज पुरवठा केला जात होता. मात्र या लाईनवरून वीज पुरवठा गेल्याने व्होल्टेजची गंभीर समस्या निर्माण होत होती. कमी व्होल्टेजमुळे कृषीपंप काम करीत नाही. याबाबत शेतकºयांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे शासनाने मागील वर्षी कृषीपंपांना उच्चदाब वाहिणीद्वारेच वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार ३१ मार्च २०१८ पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज वीज जोडणीसाठी प्रलंबित होते. अशा शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वाहिणीद्वारेच पुरवठा केला जाणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या शेतापर्यंत उच्चदाब वाहिणी नेऊन त्याच्या शेतात ट्रान्सफार्मर बसविला जाणार आहे. १०० फुटाच्या आत अंतरावर असलेल्या दुसºया शेतकऱ्याने मागणी केल्यास त्याला संबंधित डीपीवरून वीज पुरवठा दिला जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत एका ट्रान्सफार्मरवरून दोन पेक्षा अधिक पंपांना वीज पुरवठा केला जाणार नाही. त्यासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसविले जाणार आहे.राज्य शासनाने घोषणा केल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ३५५ कृषीपंप वीज जोडणीची मागणी आहे. त्यापैकी १७१ कृषीपंप लावण्यात आले आहेत. त्यातील २१ कृषीपंप सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १५० ट्रान्सफार्मर लावून १५१ वीज जोडण्या सुरू झाल्या आहेत.एका वीज जोडणीसाठी लाखोंचा खर्चउच्चदाब वाहिनीने कृषीपंपाला वीज पुरवठा करताना शासनाला लाखो रुपयांचा खर्च येतो. ट्रान्सफार्मरची किंमत दोन ते अडीच लाख रुपये एवढी आहे. सोबतच उच्चदाब वाहिनीसुध्दा आणावी लागते. एकंदरीतच एका जोडणीचा खर्च तीन ते चार लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे. शेतकऱ्यांसाठी शासन एवढा खर्च करीत आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यातून उत्पादन घ्यावे, अशी अपेक्षा आहे. मात्र काही शेतकरी केवळ वीज जोडणीचा लाभ घेईपर्यंत वीज जोडणीसाठी घाई करतात. त्यानंतर मात्र त्यामध्ये कोणतेच उत्पादन काढत नाही, परिणामी शासनाचा लाखोंचा खर्च पाण्यात जातो असे महावितरणचे अधिकारी सांगतात.उच्चदाब वीज जोडणीमुळे कृषीपंपांची व्होल्टेजची समस्या कायमची संपणार आहे. शासनाने निर्णय घेतल्यापासून जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. येत्या सहा महिन्यात उर्वरित सर्व शेतकºयांना उच्चदाब वीज जोडणीचा लाभ देण्यासाठी महावितरण प्रयत्नरत आहे.- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, महावितरण गडचिरोली

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी