शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बारमाही रस्त्याची प्रतीक्षा, पावसाळ्यात गावाला बेटाचे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:37 IST

Gadchiroli : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातही कर्जेली गाव उपेक्षितच !

गडचिरोली : सिरोंचापासून ६४ कि.मी. अंतरावर असलेल्या रमेशगुडम ग्रामपंचायत अंतर्गत अतिदुर्गम गाव म्हणून कर्जेली या गावाची ओळख आहे. सिरोंचा तालुक्यातील हे शेवटचेच गाव. विपरीत भौगोलिक परिस्थिती आणि मोजक्याच लोकांची वस्ती, त्यामुळे आतापर्यंत या गावाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत असतांना या गावाला स्वातंत्र्याची फळे कधी चाखायला मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अतिदुर्गम कर्जली या गावाला जाण्यासाठी बारमाही पक्का रस्ताही झालेला नाही. पावसाळ्यात एका बाजूला रमेशगुडम नाला, दुसऱ्या बाजूला बिडरघाट नाला, तिसऱ्या बाजूला इंद्रावती नदी अशा पद्धतीने हे गाव पाण्याने वेढलेले असते. गावातून बाहेर जाण्यासाठी नावेने जावे लागते. आजारी लोकांना, गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगानूरला नेण्यासाठी नावेने गावातून बाहेर निघून बैलबंडीने मोठी कसरत करून जावे लागते. आठवडी बाजारासाठीसुद्धा नावेने नाला पार करून देचलीपेठाला जावे लागते.

दूरसंचार सेवा तर सोडा, वीजपुरवठा एकदा खंडित झाला की पूर्ववत सुरू होण्यासाठी आठवडा लागतो. त्यामुळे या गावाचा तालुक्याशी नेहमीच संपर्क तुटलेला असतो. या गावाची लोकसंख्या जेमतेम 400 ते 500 असली तन चौथीपर्यंत प्राथमिक रेशनच्य अन्नधान्यासाठी नावेतून शाळा आणि एक अंगणवाडी या जाऊन  रमेशगुडमवरून धान्य आणावे गावात आहे. शासन व प्रशासनाच्या योजन गावात पोहोचल्या नाही.

एकमेव टॅक्सीचा नागरिकांना आधारया भागात चालणारी एकमेव खासगी टॅक्सी रमेशगुडमवरून चालते. या टॅक्सीने कर्जेलीवासीय तालुक्याला येतात. या गावाला बारमाही रस्ता झाल्यास गावकरी मुख्य प्रवाहात येऊ शकतात. शासनाच्या योजना या गावात कशा पोहोचतात माहीत नाही. अविकसित आणि प्रगतीपासून कोसो दूर असलेल्या या गावात विकासाचा चिखलातून मार्ग काढत पावसाच्या दिवसामध्ये नावेतून गावाबाहेर पडावे लागते. बऱ्याचदा अत्यावश्यक काम असल्यास तालुकास्तरावर पोहोचण्यासाठी विलंब होतो. प्रसंगी कुठेही मुक्काम करावा लागतो.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली