शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलमुक्त गडचिरोलीची प्रतीक्षाच ! गोंदियातील चार तालुके अजूनही नक्षलग्रस्तच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:16 IST

गृह विभागाकडून घोषणा : गोंदियाच्या चार तालुक्यांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासीबहुल व दुर्गम गडचिरोलीला नक्षलमुक्त होण्याची अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. २७ जून रोजी राज्याच्या गृह विभागाने नक्षलग्रस्त जिल्हे व तालुक्यांची घोषणा केली. यात संपूर्ण गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त घोषित केला असून, गोंदियातील चार तालुक्यांचाही प्रभावित तालुक्यांत समावेश आहे.

जिल्ह्यात १९८० मध्ये माओवाद्यांनी शिरकाव केला. घनदाट जंगले, दुर्गम, अतिदुर्गम गावे तसेच प्रतिकूल भौगोलिक स्थिती, दारिद्रय, अज्ञान आणि पायाभूत सुविधांचा अभाव या सर्व परिस्थितीचा फायदा घेत ही रक्तरंजित चळवळ फोफावली. या चळवळीचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यात तसेच - शेजारच्या गोंदियामध्येही झाला.

राज्यातील काही भागांमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्याने ७डिसेंबर २००४ व २०मे २००५ अन्वये राज्यातील जिल्हे, तालुके, गावे नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली होती. ४ फेब्रुवारी २०१३ मध्ये नव्याने नक्षलग्रस्त जिल्हे व तालुके जाहीर झाली. यातही संपूर्ण जिल्हा नक्षलग्रस्त घोषित केला होता. त्यानंतर २६ डिसेंबर २०१४ रोजी पुन्हा जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला.

हे तालुके नक्षलग्रस्तगोंदियातील आठपैकी चार तालुके नक्षलग्रस्त घोषित केले आहेत. गोंदिया, सालेकसा, देवरी व अर्जुनी मोरगाव या तालुक्यांचा समावेश आहे.

सुधारित प्रस्तावातही जिल्हा नक्षलग्रस्तचराज्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक लाभाच्या व बिगर आर्थिक लाभाच्या सवलती आहेत. सुधारित सवलतींचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने मंत्रिमंडळ मान्यतेसाठी ५ नोव्हेंबर २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला होता. नक्षलग्रस्त भागाचा फेरविचार करण्याच्या सूचनेनुसार पोलिस महासंचालक यांच्याकडून राज्यातील नक्षलग्रस्त भाग घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी