शहरं
Join us  
Trending Stories
1
Narayan Rane : 'मी एका उपशाखा प्रमुखाला ठार मारणार होतो, बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून...'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
2
ट्रंप यांनी जाहीर केली सरकारी मदत घेणाऱ्या देशांची लिस्ट; त्यात भारताचे तीन शेजारी, भारताचे नाव आहे का?
3
खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
4
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
5
वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरण्याचा कट! रुळांवर लाकूड ठेवल्याचे आढळले; मोठा अपघात टळला
6
"मला खुश करणं गरजेचं, अन्यथा..."; रशियन तेलावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा टॅरिफचा इशारा
7
बँक कर्मचारी संपावर जाणार, तीन दिवस व्यवहार होणार ठप्प; कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल?
8
धक्कादायक! ट्रंप यांची व्हेनेझुएलावर दुसऱ्या हल्ल्याची धमकी; आता कोलंबियाही रडारवर, दक्षिण अमेरिकेत युद्धाचे ढग?
9
भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?
10
आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६ :आज ग्रहांची चाल 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; पाहा तुमचे राशीभविष्य!
11
‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
12
मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा
13
“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे
14
“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप
15
“वचननामा नव्हे ‘वाचून’नामा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका
16
“स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार
17
“उद्धव ठाकरे यांचा महापौर झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल”; अमित साटम यांनी केला प्रत्यारोप
18
राज्यातील प्रत्येक बसस्थानक-नगरपालिकेत पुस्तकांचे सवलतीत दुकान; DCM शिंदेंची साहित्य संमेलनात घोषणा
19
ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल
20
बंडखोरी आटोक्यात; मात्र अपक्षांची डोकेदुखी कायम, ठाण्यात १३१ जागांसाठी ८६ अपक्ष रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या काशीची वाट झाली खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 05:00 IST

चामोर्शी-मार्कंडादेव रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर उखडून त्यातील गिट्टी, मुरूम निघून खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून या डांबरी मार्गाची पूर्ण वाट लागली आहे. या मार्गावर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्कंडादेव येथे विदर्भ व राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक दर्शनासाठी दररोज भाविक येत असतात मात्र रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारक भाविकांना मार्कंडादेव तीर्थस्थळी पोहोचणे कठीण झाले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव तीर्थस्थळाकडे जाणाऱ्या चामोर्शी बायपास मार्गावरील प्रवास चांगलाच खडतर झाला आहे. या मार्गाच्या दुरूस्तीचे काम मंजूर झाले आहे. पण हे काम लवकर सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. चामोर्शी-मार्कंडादेव रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर उखडून त्यातील गिट्टी, मुरूम निघून खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून या डांबरी मार्गाची पूर्ण वाट लागली आहे. या मार्गावर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्कंडादेव येथे विदर्भ व राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक दर्शनासाठी दररोज भाविक येत असतात मात्र रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारक भाविकांना मार्कंडादेव तीर्थस्थळी पोहोचणे कठीण झाले आहे. या रस्त्याची नव्याने बांधणी करावी, अशी मागणी मार्कंडादेव येथील नागरिक व भाविकांनी केली आहे . चामोर्शी - मार्कंडादेव, चामोर्शी व्हाया शंकर हेटी तसेच फराडा व मार्कंडादेव, फोकुर्डी - मार्कडादेव, चाकलपेठ वळण व्हाया मार्कंडादेव मार्गाने दररोज भाविक येत असतात. कोरोना लॉकडाऊनमध्ये जड वाहनाच्या आवागमनाने या रस्त्याची पूर्णत वाट लागून खुड्डे पडून गिट्टी उखडली आहे. त्यामुळे रस्त्याची नव्याने बांधकाम करण्याची मागणी मार्कंडादेव येथील नागरिकांनी व भाविकांनी केली आहे . स्थानिक लाेकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष हाेत आहे. 

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा