शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेची वाट सोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 01:02 IST

समाजात पसरत असलेली बुवाबाजी, करणी यासारख्या गोष्टींवर विश्वास न ठेवता समाजाने विकासाचा मार्ग पत्करावा.

खासदारांचे आवाहन : चामोर्शी येथे तालुकास्तरीय कार्यशाळाचामोर्शी : समाजात पसरत असलेली बुवाबाजी, करणी यासारख्या गोष्टींवर विश्वास न ठेवता समाजाने विकासाचा मार्ग पत्करावा. व्यसनमुक्त होऊन विज्ञानाची कास धरावी व अंधश्रद्धेची वाट सोडावी, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले. जिल्हा विकास संशोधन व कार्यान्वयन संस्था गडचिरोली तालुका शाखा चामोर्शी यांच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती या विषयावर चामोर्शी येथे आयोजित तालुक्यातील सरपंच व पोलीस पाटील यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जा. कृ. बोमनवार कनिष्ठ महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे होते. प्रमुख अतिथी म्हणून पं. स. उपसभापती आकुली बिश्वास, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हेमके, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, प्रकल्प समन्वयक मनोहर हेपट, भाजयुमोचे स्वप्नील वरघंटे, डॉ. मुरलीधर बद्दलवार, सुरेश मांडवगडे, प्राचार्य महेश तुम्पल्लीवार, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती, पर्यावरण संतुलन, ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. समाजात दिवसेंदिवस अंधश्रद्धा अधिक दृढ होत आहे. स्थानिक पातळीवर अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. जे. सातार, संचालन प्रा. दिलीप सोमनकर तर आभार सातार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष कागदेलवार, उपाध्यक्ष मोरेश्वर चलकलवार, गण्यारपवार, सचिन मरस्कोल्हे, सुखराम साखरे, कागदेलवार, आकरे, किशोर पातर, मदन नैैताम, गव्हारे, आशिष पिपरे, कावटकर, मेडपल्लीवार, वैैष्णवी राऊत, कल्पना गजभिये, गीता गद्दे, भारती उपाध्ये, अल्का उपासे, कविता झाडे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)