शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा आटली, जलसंकट होणार तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 22:32 IST

गडचिरोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी अतिशय घटली आहे. मार्च महिन्यातच वैनगंगा नदी कोरडी पडल्यालगतचे चित्र निर्माण झाले आहे. कडक उन्हाळ्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देकाटकसरीने पाणी वापरा : नदीतील विहिरीचा एक व्हॉल्व पडला उघडा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी अतिशय घटली आहे. मार्च महिन्यातच वैनगंगा नदी कोरडी पडल्यालगतचे चित्र निर्माण झाले आहे. कडक उन्हाळ्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नदी पात्रात असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीला दोन वॉल्व देण्यात आले आहेत. त्यापैकी एक वॉल्व पूर्णपणे पाण्याच्या बाहेर आला आहे. तर केवळ एक वॉल्व पाण्यामध्ये आहे. एक महिन्यापूर्वीच पाणी पातळी कमी झाली होती. नगर परिषदेने जेसीबीच्या सहाय्याने पार बांधून विहिरीच्या बाजुने धार वळविली होती. विहिरीजवळ सुध्दा एक पार बांधून पाणी अडवून ठेवले. मात्र पाणी पातळी कमी झाल्याने केवळ एकाच वॉल्व मधून पाणी पुरवठा होत आहे. पंपाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने शहरातील पाण्याच्या टाक्या भरणे अशक्य झाले आहे.मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईची चाहूल लागली आहे. उन्हाळ्यात पाणी संकट तीव्र होणार आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात पाणी पुरत नसल्याने काही दिवस कमी प्रमाणात पाणी पुरवठा केला जात होता. तीच स्थिती यावर्षीही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. उन्हाळ्यात पुन्हा पाणी पातळी घटणार आहे. त्यामुळे शहराला पुरेसा पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.- मुक्तेश्वर काटवे,पाणी पुरवठा सभापती,नगर परिषद गडचिरोली

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीटंचाई