समस्या जाणल्या : सल्लागार समितीने दिले मागण्यांचे निवेदनदेसाईगंज : दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे डीआरएम आलोक कंशल यांनी मंगळवारी देसाईगंज येथील वडसा रेल्वे स्टेशनला सहकारी अधिकाऱ्यांसह भेट दिली. येथील रेल्वे विभागाच्या कामाची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, वडसा रेल्वे सल्लागार समितीने मंजूर झालेली कामे तत्काळ करून लोकार्पण करणे, संपूर्ण रेल्वे फलाटावर प्रवासी निवारा तयार करणे, पोलीस चौकी उभारणे, महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालय, कॅन्टींगमध्ये भोजनाची व्यवस्था, वर्ग ७ क्रमांकाचे तिकीट बुकिंग केंद्र सुरू करणे, तिकीट कलेक्टरची नियुक्ती, विशेष अतिथी गृह, अंडर ग्राऊंड पुलाच्या कामाला वेग, दरभंगा एक्स्प्रेसला थांबा देणे, डामेंट्री खोली, निवासाची व्यवस्था करावी आदी मागण्यांचा समावेश सल्लागार समितीने दिलेल्या निवेदनात आहे. याप्रसंगी रेल्वे विभागाचे वरिष्ठ डीओएम सचिन शर्मा, डीसीएम डी. एस. तोमर, वरिष्ठ डीएसओ एस. के. मसराम, वरिष्ठ डीईएन पी. व्ही. सत्यनारायण, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डॉ. विष्णू वैरागडे, बाळा सगदेवे, भरत जोशी, संजय गणवीर, पल्लवी लाडे, ऋषी शेबे, प्रबंध व्यवस्थापक पी. एस. भोंडे, स्टेशन मास्तर संजयकुमार, रितेशकुमार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
डीआरएमची वडसा स्टेशनला भेट
By admin | Updated: October 21, 2015 01:30 IST