शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
4
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
5
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
6
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
8
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
12
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
13
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
14
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
15
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
16
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
17
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
18
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
19
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
20
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

११ खुनांसह हिंसक कारवाया, आठ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षल्यांचे आत्मसमर्पण

By संजय तिपाले | Updated: July 24, 2023 19:09 IST

२८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षली सप्ताह होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचे हे मोठे यश असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी म्हटले आहे.

गडचिरोली : नक्षली चळवळीत ११ निरपराध व्यक्तींचा बळी घेणाऱ्या, पोलिसांविरुध्दच्या चकमकीत सहभागी होऊन अनेक हिंसक कारवाया करणाऱ्या छत्तीसगडच्या दोन नक्षल्यांनी २३ जुलै रोजी आत्मसमर्पण केले.  विशेष म्हणजे त्या दोघांवर मिळून शासनाने एकूण आठ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षली सप्ताह होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचे हे मोठे यश असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी म्हटले आहे.अडमा जोगा मडावी (२६,रा.जिलोरगडा पामेड ता. उसूर जि.बिजापूर , छत्तीसगड), टुगे कारु वड्डे (३५,रा.कवंडे बेद्रे ता.बैरामगड जि.बिजापूर छत्तीसगड) असे या दुकलीचे नाव आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी   पत्रकार परिषदेत   सविस्तर माहिती दिली. अपर अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता उपस्थित होते. 

मडावी हा २०१४ मध्ये एलजीएस या नक्षली दलममध्ये सदस्य म्हणून भरती  झाला होता. २०२१ पर्यंत तो कार्यरत होता. त्यानंतर झोन ॲक्शन टीममध्ये बदली होऊन त्याने जून २०२३ मध्ये दलम सोडून घरी परतणे पसंत केले. वड्डे हा २०१२ मध्ये जाटपूर दलममध्ये जनमिलीशीय सदस्य पदावर भरती झाला व २०२३ पर्यंत कार्यरत राहून नंतर दलम सोडली. अडमा मडावीवर पाच खुनांसह चकमकीचे आठ, जाळपोळचा एक व इतर दोन गुन्हे नोंद आहेत तर टुगे वड्डेवर सहा खुनांचा आरोप असून जाळपोळीचा एक गुन्हा नोंद आहे. मडावीवर राज्य शासनाने सहा लाखांचे तर वड्डेवर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मडावी याने लाहेरी व वड्डे याने भामरागड पोलिसांना संपर्क करुन आत्मसमर्पण केले.  

आत्मसमर्पणानंतर दोघांनाही लाखोंचे बक्षीसदरम्यान, नक्षली चळवळीतून बाहेर पडून सामान्य जीवन जगू पाहणाऱ्यांना शासनाने आत्मसमर्पण योजना २००५ मध्ये सुरु केली आहे. या योजनेंतर्गत मडावी यास साडेचार लाख रुपये तर वड्डे याला चार लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यातून दोघांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार आहे. 

...म्हणून केले आत्मसमर्पणदलममध्ये पैसे गोळा करावे लागतात, वरिष्ट कॅडरचे माओवादी हा पैसा स्वत:चा वापरतात. विवाह करुनही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. आदिवासी युवक- युवतींचा माओवादी स्वत:साठी वापर करुन घेतात, नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलात वावरणे कठीण होते. दलममध्ये उच्चपदावर जाण्याची संधी मिळत नाही. याउलट पोलिसांच्या आत्मसमर्पण योजनेमुळे सामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगता येते, शिवाय सर्व गुन्हेही माफ होतात, त्यामुळे या नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. दरम्यान, नक्षली सप्ताहाच्या तोंडावर दोघांच्या आत्मसमर्पण झाल्याने नक्षली चळवळीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी