आंजी (मोठी) : नजीकच्या पेठ येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रमांतर्गत या बंधाऱ्याची उभारणी केली. या वनराई बंधाऱ्यामुळे गुरांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे. शिवाय जलसाठा झाल्याने विहिरी व हातपंपांचेही पाणी वाढणार आहे. यात सरपंच कविता लोहकरे, उपसरपंच जगदीश मस्के, सचिव जे. एस. नागदेवते, तंटामुक्तीचे अध्यक्ष निलेश ठाकरे, पवन मस्के, अंकुश कंगाले, तुषार ठाकरे, नितीन मस्के, नितीन ढोणे, कमलाकर देशमुख, स्वप्नील तेलंग, संजय कडू, रूपेश वाघमारे, रोशन ठाकरे, प्रदीप आत्राम, श्रीकांत गोरडे, बोंदरे, मसराम, श्रीरामे आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)
ग्रामस्थांनी बांधला श्रमदानातून वनराई बंधारा
By admin | Updated: November 10, 2015 02:55 IST