शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वैरागडात पाणी टंचाई तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:18 IST

वैलोचना नदी पात्रात असलेल्या जुन्याच ७५ हजार लिटर क्षमतेच्या नळ योजनेतून गावाला पाणी पुरवठा होत आहे. तसेच नळ योजनेच्या विहिरीत पाणीसाठा कमी असल्याने वैरागड गावात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनळ योजना अंतिम टप्प्यात : पिण्यासाठी गळतीच्या पाण्याचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैलोचना नदी पात्रात असलेल्या जुन्याच ७५ हजार लिटर क्षमतेच्या नळ योजनेतून गावाला पाणी पुरवठा होत आहे. तसेच नळ योजनेच्या विहिरीत पाणीसाठा कमी असल्याने वैरागड गावात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी गावातील बरेच लोक पिण्यासाठी गळतीच्या पाण्याचा वापर करीत आहेत.ग्रामस्थ पाईप लाईन वॉल्वमधून निघणारे गळतीचे पाणी पिण्यासाठी आपल्या घरी नेत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. वैरागड येथील वाढत्या लोकसंख्येमुळे जुन्या नळ योजनेचे पाणी गावाला पुरत नाही. परिणामी मागील १०-१५ वर्षापासून उन्हाळ्यात वैरागड येथे पाणी टंचाईची समस्या जाणवते. येथील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. सद्य:स्थितीत गावातील पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणच्या नळाला पिण्यापुरतेही पाणी येत नाही. जेवढे पाणी येते ते गढूळ असते. त्यामुळे अनेक नागरिक हातपंप व विहिरीचा आधार घेऊन आपली पाण्याची गरज पूर्ण करीत आहेत. मात्र या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.दरवर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन मागील दोन ते तीन वर्षांपासून वैरागड येथील गोरजाई डोहावर अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त नवीन नळ योजनेचे काम प्रस्तावित आहे. सद्य:स्थितीत या नळ योजनेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे, अशी माहिती ग्रामीण पेयजल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.गेल्या तीन-चार वर्षाच्या तुलनेत वैरागड गावातील कुटुंबधारकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नळ योजनेचे पाणी गावात अपुरे पडते. गावातील पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना अद्यापही केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाप्रती रोष व्यक्त होत आहे. सदर समस्येसंदर्भात लोकमतने अनेकदा वृत्त प्रकाशित करून ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र निगरगट्ट प्रशासनाला अद्यापही जाग आली नाही.महिलांची पाण्यासाठी पायपीटवैरागड गावात सार्वजनिक विहिरी व हातपंप आहेत. मात्र या साधनांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे अनेक कुटुंब नळ योजनेच्या पाण्यावर अवलंबून असतात. मात्र वैलोचना नदीची पाणी पातळी खालावली असल्यामुळे येथे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी गावातील महिला व मुली सकाळपासूनच पाण्यासाठी पायपीट करीत असतात. हातपंप व विहिरीवर महिलांची सकाळपासूनच गर्दी दिसून येते.पाणी समस्या कमी करण्यासाठी नदी पात्रात तत्काळ हातबोअर पंप बसविण्यात आला आहे. मात्र भूजलपातळी इतकी खोल गेली आहे की, या हातबोअर पंपाचे पाणी विहिरीपर्यंत पोहोचत नाही.- एन. ए. घुटके, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत वैरागड

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई