शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विधान भवनावर फडकवणार विदर्भाचा झेंडा, विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्धार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 18:00 IST

विदर्भातील शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न संपविण्यासाठी आणि विदर्भाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हा एकमेव पर्याय आहे. असे असताना सरकार या मुद्यावर चाल ढकलपणा करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून येत्या १ मे महाराष्ट्र दिनी विदर्भातून हजारो शेतकरी, बेरोजगार, महिलांना घेऊन नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा फडकविला जाईल, असा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी येथे व्यक्त केला.

गडचिरोली : विदर्भातील शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न संपविण्यासाठी आणि विदर्भाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हा एकमेव पर्याय आहे. असे असताना सरकार या मुद्यावर चाल ढकलपणा करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून येत्या १ मे महाराष्ट्र दिनी विदर्भातून हजारो शेतकरी, बेरोजगार, महिलांना घेऊन नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा फडकविला जाईल, असा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी येथे व्यक्त केला.समितीच्या वतीने येत्या मार्च, एप्रिल व मे महिन्यात केल्या जाणा-या विविध आंदोलनांची माहिती सोमवारी येथे नेवले व इतर पदाधिका-यांनी दिली. त्यात १ मार्चला शासनाच्या निषेधार्थ बेरोजगारांचे डिग्री जलाओ आंदोलन, तर १६ व १७ एप्रिलला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यात विदर्भ आर्थिकदृष्ट्या कसे सक्षम राज्य राहीले हे पटवून दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. वर्षाला २ कोटी लोकांना रोजगार देऊ असे सांगणा-या सरकारमुळे नोटबंदीनंतर अनेक उद्योग बंद पडून लाखो युवक बेरोजगार झाले. आता आणखी ३० टक्के नोकरकपात करण्याचा सरकारचा मानस आहे. नोक-या कमी करणारे सरकार नवीन नोक-या काय देणार? दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढतच आहे. म्हणून विदर्भ राज्य वेगळे करून विदर्भवासियांच्या विकासाचा मार्ग मोकळा करा, अशी मागणी समितीच्या पदाधिका-यांनी सरकारला उद्देशून केली.या पत्रपरिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे गडचिरोली जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, पश्चिम विदर्भाच्या महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, सुधाकर नाईक, जगदीश बद्रे, जिल्हा सचिव डॉ.देवीदास मडावी, घिसू पाटील खुणे, सुधाकर डोईजड, प्रतिभा चौधरी, अनिता मडावी, रमेश भुरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शब्द पाळला नाही तर सत्ता जाईलभाजपने निवडणूक काळात दिलेले विदर्भ राज्याचे आश्वासन पाळण्याची ही वेळ आहे. आज विदर्भातील आमदारसंख्येच्या बळावर राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे राजकीय अडचणीतून भाजप सरकार विदर्भ राज्याचा मुद्दा टोलवत आहे. लगतच्या तेलंगणाच्या निर्मितीसाठीही आंध्रातील काँगे्रस सरकारने विलंब केला आणि दोन्ही राज्यात काँग्रेसला हार पत्करावी लागली. भाजपने शब्द पाळण्यास विलंब लावल्यास भाजपाचीही तीच गत होईल, असा इशारा राम नेवले यांनी दिला.

टॅग्स :nagpurनागपूर