शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

तालुक्याबाहेरील विक्रेत्यांना आता धानोराच्या बाजारात मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तालुक्यातील विक्रेत्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच मास्क शिवाय फिरू नये. अन्यथा दंड आकारण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला. देशभर कोरोना विषाणूचे संकट वाढतच चालले आहे. धोका अधिक असलेल्या ठिकाणी सरकारने लाकडाऊन केले असून जिल्हाबंदी लागू केली आहे.

ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांच्या सूचना । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन कडक

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानोरा येथे बाजार भरत असून तालुकाबाहेरील विक्रेत्यांनी येथे येऊन अनावश्यक गर्दी टाळावी. अशा सूचना धानोरा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांनी विक्रेत्यांना दिल्या आहेत.१७ जुलै रोजी मुख्याधिकारी बेंबरे यांनी धानोरा येथील भाजीबाजार व इतर मार्केटला भेट देऊन पाहणी केली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तालुक्यातील विक्रेत्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच मास्क शिवाय फिरू नये. अन्यथा दंड आकारण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला. देशभर कोरोना विषाणूचे संकट वाढतच चालले आहे. धोका अधिक असलेल्या ठिकाणी सरकारने लाकडाऊन केले असून जिल्हाबंदी लागू केली आहे. सरकारने अनेक निर्बंध लावूनही काही नागरिक नियमाचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. धानोरा येथेही असाच प्रकार सुरू असल्याचे दिसून आले. धानोरा येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरत होता. परंतु कोरोनामुळे लाकडाऊन झाल्यापासून सदर बाजार बंद करण्यात आला. येथील मुख्य मार्गावर दैनंदिन गुजरी भरवली जाते. जेणेकरून नागरिकांना भाजीपाला, फळ या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हावे परंतु या गुजरीमध्ये दर शुक्रवारी बाहेरील तालुक्यातील विक्रेते येऊन आपले दुकान लावत आहेत. आवश्यक वस्तू व्यतिरिक्त इतरही विक्रेते आपले दुकान लावत होते. त्यामुळे मुख्य मार्गावर अनावश्यक गर्दी वाढत चालली होती हा मुख्य मार्ग असल्याने गर्दीमुळे अपघाताचा धोका होण्याची शक्यता वाढत चालली होती. तसेच अनेक नागरिक व दुकानदार विना मास्क फिरताना दिसत होते व फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे १७ जुलै रोजी न.पं.चे मुख्याधिकारी बेंबरे व पोलिस कर्मचाºयांनी शहरात फिरून तालुकाबाहेरील विक्रेत्यांना आवश्यकत्या सूचना केल्या. धानोरा तालुक्याच्या बाहेरील विक्रेत्यांनी आपले दुकान धानोरा येथे लावू नये, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी न.पं.चे कर्मचारी गुलाब ठाकरे, उमेश नागपुरे, मुरलीधर बोगा व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Marketबाजार