गडचिराेली : शहराची मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चाैकात असून अनेक दुकाने आहेत. परंतु काही ग्राहक स्वत:ची वाहने पार्किंगमध्ये न ठेवता रस्त्यावरच लावतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. संबंधित विभागाने रस्त्यावरील पार्किंग हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यासाठी निवेदनही दिले आहे. मात्र उपाययोजना करण्यात आली नाही.
ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
धानाेरा : जंगलव्याप्त ग्रामीण भागात वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागून शेताचे रक्षण करावे लागत आहे. त्यातच वाघ-बिबटसारख्या हिंस्र प्राण्यामुळेही शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. त्यावर उपाय करण्याची मागणी केली आहे.
ऑटोचालकांच्या समस्या सोडवा
गडचिराेली : ऑटोचालकांना कामगार कायद्यानुसार कोणतीही सुरक्षा नाही. ऑटाेचालकांच्या हितासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. भक्कम आर्थिक निधी देऊन ऑटोचालक व मालकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
नाल्यातील गाळ काढण्याची मागणी
गडचिराेली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता आहे. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात. त्यामुळे दुरुस्ती करून गाळ काढण्याची मागणी केली जात आहे.
शासकीय योजनेपासून बचतगट वंचित
काेरची : ग्रामीण भागातील पुरुष व महिला बचतगटाच्या माध्यमातून प्रगती साधत आहेत. त्यांच्याकरिता शासनाने स्वतंत्र विभाग निर्माण केला आहे. या माध्यमातून विकासाची दालने खुली झाली आहेत. परंतु शासकीय योजनेपासून बचतगट वंचित आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.