शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

वैलोचना नदी पुलावरील लाकडामुळे वाहतुकीचा खोळंबा

By admin | Updated: September 19, 2015 02:01 IST

प्रचंड मेघगर्जनेसह बुधवारच्या रात्रीपासून गुरूवारी सायंकाळपर्यंत झालेल्या दमदार पावसामुळे वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीवरील कमी उंचीच्या पुलावर पाणी चढले.

बसफेऱ्या रद्द : पुरामुळे वैरागड-मानापूर मार्ग दोन दिवस होता बंदवैरागड : प्रचंड मेघगर्जनेसह बुधवारच्या रात्रीपासून गुरूवारी सायंकाळपर्यंत झालेल्या दमदार पावसामुळे वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीवरील कमी उंचीच्या पुलावर पाणी चढले. त्यामुळे वैरागड-मानापूर या मार्गावरील वाहतूक बुधवारच्या रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत बंद होती. दुपारच्या सुमारास पूर ओसरल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली असती, मात्र या पुलावर मधोमध मोठे लाकूड असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.वैलोचना नदीला आलेल्या पुराने वाहून आलेले मोठे झाड पुलावर आडवे पडले. त्यामुळे वैरागड-मानापूर मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाच्या सकाळच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराच्या सकाळच्या बसेस वैरागडपर्यंत पोहोचल्या. मात्र पुलावर मोठे झाड असल्याने सदर बसेस येथूनच परत गेल्या. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली. बुधवारी रात्रीपासून संततधार पाऊस झाल्याने वैरागड-मानापूर मार्गावरील पुलावरून तीन फूट पाणी वाहत होते. दरम्यान पुराने वाहून आलेल्या लाकडामुळे वाहतुकीचा बराचवेळा खोळंबा झाला. हलक्याशा पावसानेही वैलोचना नदीला पूर येत असतो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वारंवार प्रभावीत होते. त्यामुळे वैलोचना नदीवर नव्याने मोठ्या उंचीचा पूल बांधावा, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे. मात्र याकडे प्रशासनाचा कायम कानाडोळा होत आहे. परिणामी या अडचणींचा सामना नागरिकांना करावाच लागत आहे. (वार्ताहर)