शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

आपल्या गावात राबविणार विविध नाविन्यपूर्ण उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:56 IST

हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने बेजूर गावातील ४२ आदिवासी महिला व पुरूषांना अभ्यासदौऱ्यासाठी शहरी भागात पाठविण्यात आले होते. तीन दिवशीय अभ्यास दौरा आटोपून बेजूरवासीय स्वगावी परतल्यानंतर त्यांनी या अभ्यास सहलीतून आलेले अनुभव लोकांपुढे कथन केले.

ठळक मुद्देबेजूरवासीयांचा निर्धार : लोकबिरादरीत कथन केले सहलीतील अनुभव, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडल्याच्या व्यक्त केल्या भावना

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने बेजूर गावातील ४२ आदिवासी महिला व पुरूषांना अभ्यासदौऱ्यासाठी शहरी भागात पाठविण्यात आले होते. तीन दिवशीय अभ्यास दौरा आटोपून बेजूरवासीय स्वगावी परतल्यानंतर त्यांनी या अभ्यास सहलीतून आलेले अनुभव लोकांपुढे कथन केले. दरम्यान मोठमोठ्या शहरात यशस्वी झालेले व पाहून आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या गावात राबविणार, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.१७ ते २९ सप्टेंबरदरम्यान बेजूरपल्लीतील ४२ आदिवासी नागरिकांनी तीन दिवसाचा अभ्यासदौरा केला. यामध्ये १२ महिला, २९ पुरूष व एक सहा वर्ष वयाच्या मुलीचा समावेश होता. ६ ते ६० वर्ष वयोगटातील आबालवृध्द आदिवासी नागरिकांनी अभ्यासदौऱ्यातून मिळालेले अनुभव कथन केले. वरोरानजीकच्या आनंदवन येथील कापड गिरणी, अंध अपंगांची शाळा, विविध वस्तूंची निर्मिती करणारे बोट नसलेले हात व हात नसलेले शरीर, तरीही उद्योगी व सर्वांच्या चेहºयावर असणारा आनंद बघून आम्ही भारावून गेलो, असे अभ्यासदौºयातील आदिवासींनी सांगितले. आनंदवनातील विविध उपक्रमातून आम्हाला प्रेरणा मिळाली. अशोकवनातील चंदनाची शेती व मिलिया डुबीया वनस्पतीची शेती पहिल्यांदा आम्ही बघितली.अभ्यासदौऱ्यादरम्यान नागपूर येथील दीक्षाभूमी, गोवारी शहीद स्मारक यांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली. इंग्रजांच्या काळातील बंगला व तेथील अजब प्राचीन वस्तू बघून आम्हाला आमच्या आदिवासी संस्कृतीचे दर्शन झाल्याची प्रचिती आली, असे नागरिकांनी सांगितले. क्रिकेट स्टेडीयम, लोकमत भवन, रिजर्व बँक ईमारत, हायकोर्ट बंगला, रेल्वे स्टेशन, विमानतळ, रस्त्यावरील भरगच्च वाहतूक, लोकांची वर्दळ, मेट्रो हे सारे पाहताना मनात धाकधुक होती; मात्र लोकबिरादरी प्रकल्पातील राहुल भसारकर व मुंशी दुर्वा यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला कसलाही त्रास झाला नाही. मेट्रोच्या डब्ब्यात बसल्याचा आनंद आम्ही कधीही विसरू शकणार नसल्याचे बेजूरवासीयांनी सांगितले.सोमनाथ प्रकल्पातील टायर बंधारा व सिमेंट बंधारा बघून आपणही आपल्या गावाजवळील नाल्यावर असा बंधारा बांधण्याचा मनोदय व्यक्त केला. सोमनाथ प्रकल्पातील शेती व विविध तलाव बघून शेती विकासाचा प्रत्यय आला. एकंदरीत या अभ्यास दौऱ्यात खऱ्या अर्थाने आधुनिकतेची ओळख झाली. न पाहिलेले विश्व बघितले. न भेटलेली माणसे, न अनुभवलेले प्रसंग पाहिले. कृषी क्षेत्रातील प्रगती बघितली. आनंदवनातील दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील आनंद बघितला असल्याचे यावेळी सांगितले.चैतू रामा तेलामी, दौलत विज्जा दुर्वा, मनोज रामजी पुंगाटी, बाजू अमलू आत्राम, मुंशी देवू दुर्वा, चिन्ना कुंडी आत्राम, सैनू जुरु दुर्वा, सुधीर लालू आत्राम, दानू दसरु आत्राम, कुम्मा रामा तेलामी, मंगरु लालसू दुर्वा, शिवाजी चमरू तेलामी, राजू चुक्कू मुडमा, चिन्ना तेलामी, भिमा आत्राम, पुसू मुडमा, चैते भिका मुहुंदा इत्यादींनी अनुभव कथन केले. यावेळी प्रकल्पातील कार्यकर्ते अशोक गायकवाड उपस्थित होते.पुन्हा चार गावातील आदिवासींचा निघणार अभ्यास दौराबाबांनी स्वाभिमानाने जगण्याची उमेद कुष्ठरोग्यांमध्ये जागविली. त्यामुळे आनंदवन उभे राहिले. आदिवासी बांधवांना यातून प्रेरणा मिळावी, त्यांचा आनंद द्विगुणीत व्हावा हा या मागे हेतू आहे. आदिवासिंच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला काम करण्यास उत्साहीत करतो. मागील वर्षी मडवेली-जिंजगावच्या आदिवासींचा अभ्यास दौरा काढण्यात आला होता. यावर्षी बेजूरनंतर आता दर्भा, कुमरगुडा, टेकला, व नारगुंडा या गावातील आदिवासी बांधवांचा अभ्यास दौरा दिवाळीपर्यंत आयोजित करणार असल्याचा आशावाद लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी व्यक्त केला.