शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जेजाणी मिलमध्ये नऊ हजार क्विंटल तांदळाची तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 23:11 IST

जेजाणी राईस मिलच्या रेकार्डची तपासणी केली असता, टीडीसी अहेरी, गडचिरोली व डीएमओ गडचिरोली यांचेकडून प्राप्त आरओनुसार या मिलमध्ये एकूण २३ हजार ६४५ क्विंटल एवढे धान प्राप्त झाले. ६७ टक्के प्रमाणे १५ हजार ८४२ क्विंटल तांदुळ भरडाई करून उपलब्ध करून द्यावयाचे होते. त्यापैकी शासकीय गोदामात सीएमआर तांदूळ ५ हजार ६९ क्विंटल जमा केल्याचे दिसून आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : देसाईगंज येथील जेजाणी राईस मिलची देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी जे. पी. लाेंढे यांनी १७ ऑक्टाेबरला तपासणी केली असता या राईस मिलमध्ये सुमारे ८ हजार ८०७ क्विंटल तांदूळ कमी प्रमाणात आढळून आला आहे तसा जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारीऱ्यांच्या निर्देशानुसार देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी जे. पी. लाेंढे यांनी १७ ऑक्टाेबरला प्रत्यक्ष राईस मिलमध्ये जाऊन तपासणी केली. यावेळी देसाईगंजचे तहसीलदार संताेष महाले, खरेदी अधिकारी गजानन काेकडे, निरीक्षण अधिकारी अप्पासाहेब पाटील, अविनाश माेरे, सचिन रामटेके उपस्थित हाेते तसेच जेजाणी राईसमिलच्यावतीने संजय जेजाणी, शैलेंद्र रामटेके उपस्थित हाेते. जेजाणी राईस मिलच्या रेकार्डची तपासणी केली असता, टीडीसी अहेरी, गडचिरोली व डीएमओ गडचिरोली यांचेकडून प्राप्त आरओनुसार या मिलमध्ये एकूण २३ हजार ६४५ क्विंटल एवढे धान प्राप्त झाले. ६७ टक्के प्रमाणे १५ हजार ८४२ क्विंटल तांदुळ भरडाई करून उपलब्ध करून द्यावयाचे होते. त्यापैकी शासकीय गोदामात सीएमआर तांदूळ ५ हजार ६९ क्विंटल जमा केल्याचे दिसून आले. १० हजार ७४६  क्विंटल तांदूळ सदरहू राईस मिलधारकाकडून शासनास येणेबाकी आहे. तथापि तपासणीच्यावेळी जेजाणी राईस मिलमध्ये ५० किलो वजनाचे तांदळाचे १ हजार ८२४ पोती आढळली. त्यांचे वजन ९१२ क्विंटल होते. तपासणीवेळी ३ हजार ८२० धानाची पोती आढळली. ४० किलो प्रती गोणीनुसार १ हजार ५३२ क्विंटल धानापासून ६७ टक्केनुसार १ हजार २६ क्विंटल इतकाच तांदूळ तयार होऊ शकतो. त्यामुळे सदर राईस मिलमध्ये ८ हजार ८०८ क्विंटल तांदळाची तफावत आहे.

देवीकमल राईस मिलमध्येही तांदूळ कमी -    टीडीसी अहेरी व डीएमओ गडचिरोली यांच्याकडून प्राप्त आरओनुसार देविकमल राईस इंडस्ट्रीजला एकूण ३ हजार ८८ क्विंटल एवढे धान प्राप्त झाले. ६७ टक्क्यांप्रमाणे २ हजार ६९ क्विंटल तांदूळ भरडाई करून उपलब्ध करून द्यावयाचे होते. त्यापैकी शासकीय गोदामात १ हजार ३४३ क्विंटल सीएमआर तांदूळ जमा केल्याचे दिसून आले. -    ७२५ क्विंटल तांदूळ सदरहू राईस मिलधारकाकडून शासनास येणे बाकी आहे. तथापि तपासणीच्यावेळी मिलमध्ये ५० किलो याप्रमाणे तांदळाचे ६७२ पोते आढळून आले. त्यांचे वजन ३३६  क्विंटल होते. -    तपासणी वेळी ३५० धानाची पोती आढळून आली. ४० किलो प्रती गोणीनुसार १४० क्विंटल धानापासून  ९३.८० क्विंटल इतकाच तांदूळ तयार होऊ शकतो. त्यामुळे सदर राइस मिलमध्ये ३९५.८२ क्विंटल तांदळाची तफावत दिसून येते.

 

टॅग्स :fraudधोकेबाजी