लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : नवरदेवाच्या वाहनाने धडक दिल्याने एक वऱ्हाडी जागीच ठार झाला. तर सात जखमी झाल्याची घटना आरमोरी येथील दत्त मंदिरासमोर रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.प्रदीप सुधाकर सेलोकर (३८) रा. आरमोरी असे अपघातात जागीच ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. तर लक्ष्मी गोमा मेश्राम (८०), विद्या प्रदीप सेलोकर (३५), अभिनव प्रदीप सेलोकर (५) राजू किसन कानतोडे (५०) सर्व रा. आरमोरी, वर्षा गोपीनाथ ठवकर (४०), मंगला हनुमंत फडके (४०) रा. भंडारा, अनिर्षा अनिल भावरे (२२) रा. भाकरोंडी असे जखमी असलेल्यांची नावे आहेत.आरमोरी येथील बर्डी वार्डातील संजय रामभाऊ गोंदोळे यांचे ब्रह्मपुरी तालुक्यातील खरकाळा येथील एका मुलीसोबत लग्नकार्य होते. रविवारी वरात जाण्यासाठी निघाली होती. नवरदेव घरासमोरील दत्त मंदिरात पूजा करीत होता. पावणे मंडळी रोडवर उभे होते. दरम्यान नवरदेवाचा मावसभााऊ नितीन निंबार्ते याने नवरदेवासाठी वाहन सजवायचे आहे, असे सांगून वाहन चालक राजू सोनकुसरे यांच्याकडून चावी घेतली.मात्र नितीन निंबार्ते याला वाहन चालविण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही. एमएच ३४ एएम २७३९ क्रमांकाचे वाहन मंदिरासमोर उभ्या असलेल्या वºहाड्यांच्या गर्दीतून शिरले. या अपघातात प्रदीप सेलोकर हा जागीच ठार झाला. त्याला उपजिल्हा रूगणालयात भरती केले. जखमींना गडचिरोली व ब्रह्मपुरीला हलविण्यात आले आहे. घटना घडताच आरोपी नितीन निंबार्ते हा घटनास्थळावरून पसार झाला. आरमोरी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत.सेलोकर कुटुंबावर दुखाचा डोंगरसेलोकर कुटुंबातील प्रदीप सुधाकर सेलोकर हे घरातील कर्तेव्यक्ती जागीच ठार झाले. त्यांच्या पत्नी विद्या सेलोकर व पाच वर्षाचा मुलगा अभिनव हे दोघेही गंभीर जखमी आहेत. एकाच वेळेस एकाच कुटुंबातील तिघांवर काळाने झडप घातल्याने आरमोरी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.दुचाकीमुळे वाचले अनेकांचे प्राणमंदिरासमोरच राजू कानतोडे हा दुचाकी स्टॅन्डवर ठेवून बसला होता. सर्वप्रथम वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकी खाली कोसळल्याने वाहनाच्या गतीस अडथळा निर्माण झाला. यात राजू कानतोडे हा चाकात दबला गेला व तोही जखमी झाला. मात्र कित्येकांचे प्राण वाचले.
नवरदेवाच्या वाहनाच्या धडकेत वऱ्हाडी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:23 IST
नवरदेवाच्या वाहनाने धडक दिल्याने एक वऱ्हाडी जागीच ठार झाला. तर सात जखमी झाल्याची घटना आरमोरी येथील दत्त मंदिरासमोर रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रदीप सुधाकर सेलोकर (३८) रा. आरमोरी असे अपघातात जागीच ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
नवरदेवाच्या वाहनाच्या धडकेत वऱ्हाडी ठार
ठळक मुद्देसात जखमी : आरमोरी शहरातील घटना, वऱ्हाड्यांच्या गर्दीत शिरले वाहन