शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

गडचिरोली जिल्हा बँकेला वैकुंठभाई मेहता पुरस्कार प्रदान; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत सन्मान सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 19:40 IST

गडचिरोली जिल्हा सहकारी बँक ५५ शाखांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या दुर्गम भागापर्यत ४ लाख ३० हजार ग्राहकांना बँकिंग सेवा देत आहे. विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बँकेने आपली सेवा अधिक लोकाभिमुख केल्याने ग्रामीण नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणे सुलभ झाले आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०१८-१९ या आर्थिक वर्षातील कै.वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराने सोमवारी (दि.१०) फेब्रुवारी रोजी सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा झाला.गडचिरोली जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार व मुख्य व्यवस्थापक अरुण निंबेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जिल्हा सहकारी बँकांच्या श्रेणीमधून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार, तर सातारा जिल्हा सहकारी बँकेला द्वितीय आणि सिंधूदुर्ग सहकारी बँकेला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्टÑ राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष मुकूंद कळमकर, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे उपस्थित होते.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देशातील सहकार क्षेत्रात महाराष्ट्रात राज्याचा मोठा वाटा आहे. नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल भागातील नागरिक व शेतकºयांना कर्जपुरवठा करण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणाºया गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला, ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. राज्यातील काही जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. या बँकांनी गडचिरोली जिल्हा बँकेपासून धडा घेण्याची गरज असल्याचे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले. तसेच गडचिरोली जिल्हा बँकेची भक्कम आर्थिक स्थिती व तंत्रज्ञानाच्या वापराची त्यांनी प्रशंसा केली.गडचिरोली जिल्हा सहकारी बँक ५५ शाखांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या दुर्गम भागापर्यत ४ लाख ३० हजार ग्राहकांना बँकिंग सेवा देत आहे. विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बँकेने आपली सेवा अधिक लोकाभिमुख केल्याने ग्रामीण नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणे सुलभ झाले आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAjit Pawarअजित पवार