शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वाहिली ‘बाबूजी’ जवाहरलालजींना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2022 05:00 IST

माजी खा. माराेतराव काेवासे, गाेंडवाना विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डाॅ. श्रीराम कावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या डाॅक्टर सेलचे प्रदेश महासचिव डाॅ. प्रमाेद साळवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसनअली गिलानी, सामाजिक कार्यकर्ते मनाेहर हेपट, विनायक बाेरकर, विश्वजित काेवासे, रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. किशाेर ताराम, ‘लाेकमत’चे कार्यालय प्रमुख डाॅ. गणेश जैन, जिल्हा प्रतिनिधी मनाेज ताजने, ‘लाेकमत’ समाचारचे जिल्हा प्रतिनिधी हरीष सिडाम, सखी मंचच्या जिल्हा संयाेजिका रश्मी आखाडे आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ‘लाेकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि राज्याचे माजी आराेग्य व उद्याेगमंत्री जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. यानिमित्त येथील प्रेस क्लब भवनात आदरांजलीसह रक्तदान शिबिराचेही आयाेजन केले हाेते.माजी खा. माराेतराव काेवासे, गाेंडवाना विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डाॅ. श्रीराम कावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या डाॅक्टर सेलचे प्रदेश महासचिव डाॅ. प्रमाेद साळवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसनअली गिलानी, सामाजिक कार्यकर्ते मनाेहर हेपट, विनायक बाेरकर, विश्वजित काेवासे, रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. किशाेर ताराम, ‘लाेकमत’चे कार्यालय प्रमुख डाॅ. गणेश जैन, जिल्हा प्रतिनिधी मनाेज ताजने, ‘लाेकमत’ समाचारचे जिल्हा प्रतिनिधी हरीष सिडाम, सखी मंचच्या जिल्हा संयाेजिका रश्मी आखाडे आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते.रक्तदानासाठी चातगावच्या साळवे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी आणि सखी मंचच्या सदस्यही सरसावल्या होत्या. मात्र वजन, हिमोग्लोबिनचे प्रमाण या अटींमुळे त्यापैकी काहीजणींना रक्तदानापासून वंचित राहावे लागले. मात्र, बोरकर पेट्रोल पंपचे संचालक विनायक बोरकर आणि नलिनी बोरकर या दाम्पत्याने आपल्या लग्नाचा वाढदिवस आणि बाबूजींच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान करण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवली. रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डाॅ. किशाेर ताराम यांच्या मार्गदर्शनात रक्तपेढी विभागाच्या चमूने विशेष मेहनत घेतली.

या मान्यवरांनी वाहिली बाबूजींना आदरांजली खासदार अशोक नेते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, माजी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक-यादव, गडचिरोलीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, भाजपच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश  संघटनमंत्री प्रकाश गेडाम, काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक सतीश विधाते, समशेरखाँ पठान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी न. प. उपाध्यक्ष प्रकाश ताकसांडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष रामकिरीत यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी न. प. सभापती विजय गोरडवार, प्रा. डॉ. प्रकाश किरकिरे, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे मुनिश्वर बोरकर, गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी वर्षा कोल्हे यांच्यासह ‘लोकमत’ सखी मंचच्या सदस्य, वार्ताहरांनी  बाबूजींच्या प्रतिमेला पुष्प वाहून आदरांजली व्यक्त केली.

 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाBlood Bankरक्तपेढी