शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

वाघाशी झुंज देऊन वाचविले स्वत:चे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 23:42 IST

शेतातून घरी परत येत असताना झुडूपात लपून बसलेल्या वाघाने अचानक पाठीमागून हल्ला केला.

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : शेतातून घरी परत येत असताना झुडूपात लपून बसलेल्या वाघाने अचानक पाठीमागून हल्ला केला. मानेखालील भागाला पंजे मारून समोर उडी घेतली. दुसºयांदा हल्ला करण्याच्या बेतात वाघ असतानाच हातातील कुºहाडीने वाघाचा हल्ला परतवून लावल्याची घटना रवी-कोंढाळा मार्गालगत शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.शिवदास वासुदेव चौके (४०) रा. रवी असे हिंमतीने वाघासोबत झूंज देणाºया नागरिकाचे नाव आहे. आरमोरी तालुक्यातील रवी, कोंढाळा, कासवी, उसेगाव, मुल्लूर चक गावातील जंगल परिसरात मागील चार महिन्यांपासून पट्टेदार वाघाचे वास्तव्य आहे. आजपर्यंत या वाघांनी कोंढाळा येथील लवाजी मेश्राम व रवी येथील वामन मराप्पा या दोन इसमांचा बळी सुध्दा घेतला आहे. शनिवारी शिवदास वासुदेव चौके व रवींद्र श्रावण कामठे हे सकाळी रवी ते कोंढाळा रस्त्यालगत असलेल्या शेतात गेले होते.शेताची पाहणी करून दोघेही परत यायला निघाले. दरम्यान रवी, कोंढाळा रस्त्यालगत असलेल्या जंगलातून बकºयांना चारा नेण्याच्या उद्देशाने झाडाच्या फांद्या तोडत होता. दरम्यान झुडूपात लपून बसलेल्या वाघाने शिवदास चौके यांच्यावर पाठीमागून झडप घेतली. त्याच्या पाठीवर पंजा मारून समोर उडी घेतली. पुन्हा वाघाने शिवदास याच्यावर समोरून हल्ला केला. मात्र त्याचवेळी शिवदासने हातात असलेल्या कुºहाडीने वाघाचा प्रतिकार केला. वाघ आणि शिवदास हे जवळपास पाच मिनिटे एकमेकांसमोर उभे होते. दरम्यान त्याच्या जवळच असलेला सोबती रवींद्र कामटे हा मदतीला धावून आला. त्यामुळे वाघाने पळ काढला.घाबरलेल्या अवस्थेत दोघेही गावाकडे परतले. त्याचवेळी जंगल परिसरात गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाला ही माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाºयांनी शिवदास याला आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वन परिक्षेत्राधिकारी तांबटकर यांनी दोन हजार रूपयांची तातडीची मदत दिली.त्या वाघांचा बंदोबस्त कराघटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार आनंदराव गेडाम, जि.प. सदस्या मनिषा दोनाडकर, माजी जि.प. सदस्य लक्ष्मी मने, वेणू ढवगाये, पं.स. उपसभापती यशवंत सुरपाम, पं.स. सदस्य वृंदा गजभिये, देसाईगंजचे उपवनसंरक्षक फुले, वनाधिकारी बोईलकर, कांबळे, वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर आदी उपस्थित होते. त्या ठिकाणी असलेल्या वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे.