शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
3
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
5
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
6
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
7
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
8
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
9
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
10
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
11
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
12
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
13
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य
14
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
15
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
16
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
18
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
19
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
20
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती

संशोधित धानाचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला तसेच कृषी महाविद्यालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी गडचिरोली येथे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम व शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी.अमरशेट्टीवार होते.

ठळक मुद्देप्रभारी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : शिवार फेरी व शेतकरी कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कमी खर्चात जास्त उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत संशोधित धान वाणाचा वापर शेतकऱ्यांनी करावा, जेणेकरून रोग व किडींना प्रतिबंध साधून उत्पादनात वाढ घडवून आणता येईल, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला तसेच कृषी महाविद्यालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी गडचिरोली येथे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम व शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी.अमरशेट्टीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे तर मार्गदर्शक म्हणून महाबिजचे नागपूर विभागीय व्यवस्थापक सुरेश गायकवाड, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विलास तांबे, कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाडे, महाबिजचे चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक एन.पी.खांडेकर, विशेषतज्ज्ञ डॉ.विक्रम कदम, पुष्पक बोथीकर, ज्ञानेश्वर ताथोड, नरेश बुद्धेवार, गणेश गणवीर आदी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रास भेट देऊन विविध वाणांच्या पिकांची पाहणी केली. पी.के.व्ही.तिलक, पी.के.व्ही.किसान व लाल धान यांची शिवार फेरीद्वारे पाहणी केली.यावेळी धानोराचे प्रगतशील शेतकरी सावसागडे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.विलास तांबे यांनी शत्रू किडी व मित्र किडी तसेच धानपिकावरील रोगाचे व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शन केले. सुरेश गायकवाड यांनी महाबिजकडे असलेल्या पीक वाणाचे वैशिष्ट्य सांगून रबी हंगामात उपलब्ध असलेल्या बियाणांची माहिती शेतकऱ्यांना दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, डॉ.एस.बी.अमरशेट्टीवार, संदीप कऱ्हाडे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहित गणवीर, जी.पी.मानकर, शशिकांत सलामे, प्रवीण नामूर्ते यांनी सहकार्य केले. एस.एस.पांडे यांनी आभार मानले.

टॅग्स :agricultureशेती