कुरखेडा : तालुक्यातील घाटी येथील बसस्थानकावर शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने या परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गावातील काही नागरिकांना बसस्थानकाच्या प्रवाशी निवाऱ्यात अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. सदर बाब माहित होताच या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली. त्यानंतर या घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सदर मृतदेह ताब्यात घेतला. मृतक इसमाच्या वर्णाचा रंग सावळा असून वय ३५ वर्षाच्या आसपास आहे. अंगात पिवळ्या रंगाचा टीशर्ट व फूलपँट घातला आहे. वृत्त लिहिस्तोवर या मृतदेहाची ओळख पटली नाही. (तालुका प्रतिनिधी)पाण्यात बुडून युवकाचा मृत्यूयेथील सोहले खडकावर पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजता घडली. कोरची येथील अविनाश कैलास अंबादे (२१) हा सोहले खडकावर पोहण्यासाठी गेला असता खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. तो कोरची येथील प्रतिष्ठित नागरिक मंसाराम अंबादे यांचा नातू होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा पसरली. अविनाशसोबत १४ ते १६ वर्ष वयोगटाचे पाच ते सहा मित्रही होते. सोहलेच्या गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
घाटी येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला
By admin | Updated: October 25, 2015 01:20 IST