शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

विद्यापीठाची साडेसाती संपेचना!

By admin | Updated: March 29, 2015 01:23 IST

२०११ मध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी राज्य सरकारने गोंडवाना विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला.

गडचिरोली : २०११ मध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी राज्य सरकारने गोंडवाना विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला. परंतु या गोंडवाना विद्यापीठांतर्गत विदवत्त व व्यवस्थापन समित्यांचे गठण मागील चार वर्षांपासून रखडलेले आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे धूळखात पडून आहे. आघाडी सरकारच्या काळात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हा प्रस्ताव बासनात बांधून ठेवला होता. नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदारूढ होऊन सहा महिने लोटले, मात्र गोंडवाना विद्यापीठाची साडेसाती अजुनही समाप्त झालेली नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सरकारप्रती अतिशय नाराज आहेत. २ आॅक्टोबर २०११ ला गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले. विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यात व्यवस्थापन परिषद, विदवत्त परिषद, विविध विद्या शाखेचे अधिष्ठाता, विविध अभ्यास मंडळाचे अध्यक्ष यांच्या नियुक्त्या व स्थापना होणे आवश्यक होते. या परिषदा व मंडळ यांच्या माध्यमातूनच विद्यापीठाच्या प्रत्येक निर्णयाला विधिवत मान्यता देण्याचे काम केले जाते. व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेशिवाय विद्यापीठाचे आर्थिक व प्रशासकीय निर्णय विधिवत होत नाही. तसेच विदवत्त परिषदेच्या मान्यतेशिवाय अभ्यासक्रमही विधीवत होत नाही. नव्याने निर्माण झालेल्या गोंडवाना विद्यापीठात यापैकी कशाचीही स्थापन करण्यात आलेली नाही. विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूंनी आपल्या मर्जीनुसार विद्या शाखांचे अधिष्ठाता निवडलेले आहेत. मात्र त्यांच्या निवडीला शासनाने अजुनही मान्यता दिलेली नाही. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाचा कारभार आतापर्यंत प्रथम कुलगुरू आपल्या मर्जीनुसारच रेटून नेत असल्याचे दिसून येत होते. मात्र मार्च २०१४ मध्ये गोंडवाना विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार हे ही सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या जागी हंगामी कुलगुरू म्हणून जिल्हाधिकारी रणजितकुमार व त्यानंतर शासनाने नियुक्त केलेले कुलगुरू म्हणून डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांनी धूरा हाती घेतली. त्यानंतर तरी राज्य शासनाकडून या समित्या गठीत होतील, अशी आशा होती. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या काळात राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव महाराज तसेच दोन आमदारांनी नागपूर येथे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थित विद्यापीठाच्या प्रश्नाबाबत बैठक घेतली. त्यानंतरही विद्यापीठाच्या विदवत्त व व्यवस्थापन समितीसह अन्य समित्यांच्या स्थापनेबाबत काहीही हालचाल शासनस्तरावरून झालेली नाही. ही फाईल अद्यापही नव्या सरकारकडेही धूळखातच आहे. (जिल्हा प्रतिनिधी)राज्यपालांनी प्राधिकरणाच्या निवडणुका घेण्याचे दिले आदेशमहाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नामेनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये असलेल्या प्राधिकरणाच्या निवडणुका आॅगस्ट २०१५ पूर्वी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्राधिकरणाच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरू झाल्या आहे. १५ एप्रिलला या संदर्भात सूचनाही जारी होण्याची शक्यता आहे. मात्र गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात राज्य सरकारकडून अजुनही प्राधिकरणाच्या समित्याच गठण झालेल्या नाही. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठात या निवडणुका कशा होतील, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.