शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनोखा उपक्रम! 'तुमचे लायसन्स दाखवा' असे म्हणणारे पोलीसच 'येथे' काढून देतात शिकाऊ वाहन परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 21:09 IST

Gadchiroli News व्यंकटापूर उपपोलीस स्टेशनतर्फे ११ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून लर्निंग लायसन्स मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देव्यंकटापूर पोलिसांचा उपक्रम दुर्गम व ग्रामीण भागातील युवांना लाभ

गडचिरोली : दुचाकीने रस्त्यावरून जात असताना शिट्टी मारून गाडी थांबवत 'तुमचे लायसन्स दाखवा' असे म्हणणारे वर्दीतले पोलीसच शिकाऊ वाहन परवाना (लर्निंग लायसन्स) काढून देत आहेत, असे म्हटले तर कदाचित विश्वास बसणार नाही; परंतु हे खरं असून व्यंकटापूर पोलीस हा उपक्रम राबवीत आहेत. हा उपक्रम नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत सुरू राहणार आहे.व्यंकटापूर उपपोलीस स्टेशनतर्फे ११ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून लर्निंग लायसन्स मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत उपपोलीस स्टेशन हद्दीतील अतिदुर्गम व नक्सलदृष्ट्या अतिसंवेदनशील अंबेझरा, लंकाचेन, कनेर्ली, कोत्तागुडम, चिन्नावट्रा, आवलमारी, पेद्दावट्रा आदी गावातील तसेच इतर भागातील तब्बल ३१२ आदिवासी बांधवांना व्यंकटापूर येथे बोलावून त्यांना शिकाऊ परवानाच काढून देण्यात आला.

नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून लर्निंग लायसन्स शिबिर ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आले. दररोज २५ ते ३० नागरिक या शिबिरात आपले लर्निंग लायसन्स काढत आहेत. नागरिकांच्या विनंतीवरून हा मेळावा ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. याचा लाभ दुर्गम व ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी केले.विविध भागातून भरपूर प्रतिसादव्यंकटापूरसारख्या अतिग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कचा अभाव आहे. सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येतात. अशा अनेक संकटांवर मात करून व्यंकटापूर उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी डॉ. मिलिंद कुंभार यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सिरोंचा, आसरअल्ली,आष्टी, चामोर्शी अशा अनेक ठिकाणच्या नागरिकांनी कॅम्पमधून आपले व मित्र परिवाराचे लर्निंग लायसन्स काढून घेत सदर योजनेचा लाभ घेत आहेत.

टॅग्स :state transportएसटी