लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात असलेल्या तुळशी या गावातील गावविकास युवक मंडळाने शिवजयंतीनिमित्त एक अनोखा वस्तुपाठ गावाला दिला. सध्या देशसेवेत असलेल्या व तुळशी गावाचे रहिवासी असलेल्या जवानांच्या मातापित्यांचा हृद्य सत्कार या मंडळाने केला. याचसोबत गावातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या वडिलांनाही गौरविण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेखाताई तोंडफोडे होत्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून नजीर जुम्मन शेख, उपसरपंच मुरलीधर दुनेदार, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान लोणारे, सुरेश नागरे , उर्वशी राऊत, सुमित्रा मारबते, चित्रकला लोणारे , तंमुस अध्यक्ष मधुकर सुकारे , पोलीस पाटील तेजस्विनी दुनेदार , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नेताजी दुनेदार, एकनाथ वघारे, उमाजी दुनेदार, विजय लोणारे, माजी सरपंच वाय.बी.मेश्राम, बंडू सुकारे, पद्माकर राऊत, राजेश मारबते, लंकेश्वर पत्रे, केवळराम दोनाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात देशसेवेत असलेल्या जवानांच्या पालकांमध्ये गुणाजी राऊत, कौशल्या राऊत, डॉ. मानिक सहारे, रघुनाथजी रामटेके यांचा तसेच गाव विकासात महत्वाचे योगदान असलेले माजी सरपंच उमाकांत कुळमेथे, सेवानिवृत्त पोलीस पाटील कान्हाजी दुनेदार, माजी सरपंच कविश्वर दुनेदार, सामाजिक कार्यकर्ते राघोबाजी शेंडे, सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव मिरगे, भिमरावजी वाघाडे, ह.भ.प.नथ्थुजी दुनेदार, शरद वाघाडे, माणिकजी दोनाडकर , यशवंत दोनाडकर, निलकंठ मारबते, अन्नाजी पत्रे, ऋषी दुनेदार, उमाजी चंडीकार, शामराव सोनवाने, नामदेव नेवारे, मदन सुकारे, सुरेश वझाडे, दिनकर सुकारे, महादेव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला .याप्रसंगी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पधेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ही स्पर्धा अ गटात इयत्ता ४ ते ८ च्या विद्यार्थ्यांंसाठी तर ब गटात इयत्ता ९ ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजीत केली होती. अ गटात प्रथम क्रमांक ईशा विजय लोणारे, द्वितीय क्रमांक कावेरी सुभाष दुनेदार , तृतीय क्रमांक आस्था मुन्ना लांडगे हिने मिळवला तर ब गटात प्रथम क्रमांक वैष्णवी प्रकाश पत्रे, द्वितीय यशश्री पुरुषोत्तम वाघाडे, तृतीय कुणाल दिलीप राऊत यांनी मिळवला. परीक्षक म्हणून पंकज धोटे, प्रदिप तुपट, कैलास गजापूरे यांनी काम पाहीले.
अनोखी शिवजयंती; गडचिरोली जिल्ह्यात केला जवानांच्या मातापित्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 13:52 IST
जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात असलेल्या तुळशी या गावातील गावविकास युवक मंडळाने शिवजयंतीनिमित्त एक अनोखा वस्तुपाठ गावाला दिला.
अनोखी शिवजयंती; गडचिरोली जिल्ह्यात केला जवानांच्या मातापित्यांचा सत्कार
ठळक मुद्देतुळशी येथील युवकांनी दिला नवा वस्तुपाठ