लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा/घोट : मुलचेरा व चामोर्शी तालुक्यात चुटुगुंटा व निकतवाडा येथे बुधवारी झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना घडली. या अपघातातील एक युवक नवविवाहित आहे.नितेश तुळशीराम तलांडे (२४) रा. चुटुगुंटा व अनिल परशुराम शेट्टीवार (२८) रा. वरूर असे मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत.अहेरी तालुक्याच्या जामगाववरून मुलचेरा तालुक्यातील कोठारी येथे आपल्या आत्याला आणण्यासाठी जामगाववरून नितेश कोठारी हा एमएच ३३ एस २५१५ क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. मुलचेराजवळील कोठारी गावाजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना बल्लारपूरजवळ मृत्यू झाला.नितेश हा हैद्राबाद येथे काम करीत होता. तीन दिवसांपूर्वीच आई-वडील आजारी असल्याने तो घरी परत आला होता. बुधवारी तो जामगाव येथे लग्न आटोपून सिंगनपेठमार्गे कोठारीला आपल्या आत्याला आणण्यासाठी जात असताना कोठारी जवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने सरळ रस्त्यालगत असलेल्या शेतात पडला. लगेच कोठारी येथील काही नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून मुलचेरा येथील ग्रामीण रुग्णालयात त्याला आणले. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला चंद्रपूरला हलविण्यात सांगितले. चंद्रपूरला नेत असताना रस्त्यातच बल्लारपूरजवळ त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ आहे.घोट-मुलचेरा मार्गावर निकतवाडा गावापासून एक किलोमीटर अतंरावर दुचाकीला अपघात होऊन अनिल परशुराम शेट्टीवार या नवविवाहित युवकाचा मृत्यू दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास झाला.अनिल शेट्टीवार हा वरुर येथून सासुरवाडी कोपरअल्ली येथे एमएच ३३ एल ६६४६ या क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. दरम्यान निकतवाडाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. त्याला गंभीर अवस्थेत घोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यु झाला. विशेष म्हणजे अनिल याचे २२ दिवसांपूर्वी लग्न झाले होते. त्याचा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने दोन्ही कुटूबांवर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. या घटनेची घोट पोलीस मदत केंद्रा नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दोन अपघातांमध्ये दोन युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:42 IST
मुलचेरा व चामोर्शी तालुक्यात चुटुगुंटा व निकतवाडा येथे बुधवारी झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना घडली. या अपघातातील एक युवक नवविवाहित आहे.
दोन अपघातांमध्ये दोन युवक ठार
ठळक मुद्देकोठारी व निकतवाडा जवळील घटना : मृतामध्ये एका नवविवाहित युवकाचा समावेश