शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

वनजमिनीसाठी महामार्गाचे काम दोन वर्षे लांबणीवर

By admin | Updated: September 7, 2016 02:15 IST

साकोली - वडसा - गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर वडसा ते आरमोरीदरम्यान वन विभागाचा राखीव जंगल तोडण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही.

नूतनीकरण कामासाठी निधी मंजूर : साकोली-वडसा-गडचिरोलीविलास चिलबुले आरमोरीसाकोली - वडसा - गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर वडसा ते आरमोरीदरम्यान वन विभागाचा राखीव जंगल तोडण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे पुढील दोन वर्षात या राष्ट्रीय महामार्गाचे काम होण्याची शक्यता नसल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन वर्षांपूर्वी साकोली-वडसा-गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग होणार अशी घोषणा करण्यात आली होती. या महामार्गाच्या कामाला डिसेंबरपासून सुरुवात होणार असल्याचे सुतोवाच करण्यात आले होते. मात्र राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या रस्ते विकास विभाग गडचिरोली व भंडारा यांच्याकडे याबाबत माहिती घेतली असता, एक ते दीड वर्षात गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होणार नसल्याचे समजते. वडसा-आरमोरीच्या मधोमध वन विभागाचा राखीव जंगल तोडण्याची परवानगी अद्यापही मिळालेली नाही. महामार्गाच्या रस्त्यालगत शेतकरी, जमिनधारकांना, दुकानदारांना जमीन हस्तांतरण करण्याबाबत कोणताही करार झालेला नाही. जर प्रशासनाने महामार्गालगतच्या जमिनीची माहिती मागितली असली तरी या बाबीचे केवळ सर्वेक्षणच सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. अलिकडेच या महामार्गाच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर केला आहे. या महामार्गाचे नूतनीकरण भंडारा व गडचिरोली येथील राष्ट्रीय महामार्ग विभाग करणार आहेत. वडसा, आरमोरी, गडचिरोलीत होणार बायपासराष्ट्रीय महामार्ग म्हणून साकोली-वडसा-गडचिरोलीची घोषणा झाली आहे. या महामार्गावर येणाऱ्या वडसा, आरमोर, गडचिरोली या तिन्ही गावांमध्ये बायपास रस्ता तयार केला जाणार आहे. आरमोरी येथे बायपास मार्ग शहराच्या बाहेरून करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. वडसा येथेही दोन ते तीन प्रकारच्या बायपासबाबतचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार यावर विचार केला जाणार आहे. गडचिरोलीला सुद्धा बायपास काढता येतो काय, याविषयी चाचपणी करण्यात येत आहे. बायपास मार्ग झाला नाही, तर शहरातून होणारा रस्ता हा ११० फुटाचाच ठेवला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग १८० फुटाचा राहतो. मात्र घरांची पडझड होऊ नये यासाठी ही व्यवस्था करावी, असा लोकप्रतिनिधींचाही दबाव आहे. त्यातून हा पर्याय पुढे आणण्यात आला आहे. शहरामधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा सिमेंट काँक्रिटचा करण्यात येणार असल्याची माहिती असून साधारणत: १५० वर्ष टिकेल, असा दावा बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.