शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

छत्तीसगड सीमेवर दोन जहाल महिला माओवाद्यांना अटक; सी- ६० पथकाची कारवाई 

By संजय तिपाले | Updated: April 7, 2024 19:47 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याचा माओवाद्यांचा डाव उधळून लावण्यात पोलिस यशस्वी झाले.

गडचिरोली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याचा माओवाद्यांचा डाव उधळून लावण्यात पोलिस यशस्वी झाले. महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवरील पिपली बुर्गी पोलिस ठाणे हद्दीतील जवेली जंगलात दोन जहाल महिला माओवाद्यांना सी- ६० पथकाने ७ एप्रिलला ताब्यात घेतले, यासोबतच गिलनगुडा जंगल परिसरातून हस्तकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या तिघांवरही महाराष्ट्र सरकारने तब्बल साडेपाच लाखांचे बक्षीस ठेवले होते.

काजल ऊर्फ सिंधू गावडे (वय २८ , रा. कचलेर ता. एटापल्ली) व गीता ऊर्फ सुकली कोरचा (वय ३१ , रा. रामनटोला, ता. एटापल्ली ) या दोन जहाल महिला माओवाद्यांनागडचिरोली- छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्याच्या सीमेवर पिपली बुर्गी हद्दीतील मौजा जवेली जंगल परिसरातून अटक केली.

पोयारकोटी चकमकीत सहभाग२०२० मध्ये कोपर्शी – पोयारकोटी जंगल परिसरात पोलिस - माओवाद्यांत चकमक झाली होती. त्यात पोलिस दलातील एक अधिकारी व एक जवान शहीद झाले होते. या चकमकीत काजल गावडे व गीता कोरचा या दोघींचा प्रत्यक्ष सहभाग होता, असे चौकशीत निष्पन्न झाले.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल ,अपर अधीक्षक यतीश देशमुख, कुमार चिंता , एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपीएफचे ई-१९१ बटा. चे असिस्टंट कमांडेन्ट मोहित कुमार, सीआरपीएफ जी-१९२ बटा. चे असिस्टंट कमांडेन्ट दीपक दास, पिपली बुर्गीचे प्रभारी अधिकारी वैभव रुपवते, गट्टा (जां.) चे प्रभारी अधिकारी चेतन परदेशी तसेच विशेष अभियान पथकाच्या जवानांनी ही कारवाई केली.

काजल १४ व्या वर्षी माओवादी चळवळीत काजल ऊर्फ सिंधू गावडे ही २०१२ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षीच माओवादी चळवळीत दाखल झाली. प्लाटुन क्र. ५५ मध्ये सदस्य या पदावर भरती होऊन सन २०१९ पर्यंत कार्यरत होती. २०१९ मध्ये कंपनी क्र. ४ मध्ये बदली होऊन सन २०२० पर्यंत सदस्य पदावर होती. त्यानंतर ती डिव्हीजनल कमिटीत सदस्य पदावर होती. तिचा सात चकमकींत सहभाग होता. कनेली व पुसेर साखरदेव जंगल परिसरात शस्त्रे जमिनीत पुरुन ठेवल्याचाही आरोपही तिच्यावर आहे. गीतावर पाच गुन्हे२०१८ मध्ये गीता कोरचा ही भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सप्टेंबर २०२० पर्यंत कार्यरत होती. सप्टेंबर २०२० मध्ये माड एरीया मध्ये बदली होऊन ती सदस्य पदावर आतापर्यंत कार्यरत होती. चकमकीच्या तीन गुन्ह्यांत तिचा सहभाग होता. एका पोलिस जवानाच्या व निरपराध नागरिकाच्या हत्येचाही तिच्यावर आरोप आहे. पिसा नरोटे पाच महिन्यांपासून देत होता गुंगारा नोव्हेंबर २०२३ मध्ये टिटोळा ते पामाजीगुडा जंगलातील टिटोळाच्या पोलिस पाटलाच्या हत्येत माओवाद्यांचा हस्तक पिसा पांडू नरोटे (रा. झारेवाडा ता. एटापल्ली ) याचा सहभाग होता. त्याला गिलनगुडा जंगलातून ताब्यात घेतले. २०१८ पासून तो माओवादी चळवळीत होता.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली