शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, १२ लाखांचे होते बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 15:53 IST

बारा लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ते दोघेही एरिया कमिटी मेंबर पदावर कार्यरत होते.

गडचिरोलीनक्षल्यांच्या टेक्निकल टीममध्ये कार्यरत असलेल्या ६३ वर्षीय नक्षलीसह एका ३४ वर्षीय महिला नक्षलीने बुधवारी गडचिरोलीपोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. हे दोघेही वेगवेगळ्या दलममध्ये एरिया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर प्रत्येकी ६ लाखांचे इनाम राज्य शासनाने ठेवले होते.

रामसिंग उर्फ सीताराम बक्का आत्राम (६३ वर्षे) आणि माधुरी उर्फ भुरी उर्फ सुमन राजू मट्टामी (३४ वर्षे) अशी या दोन आत्मसमर्पितांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे यांनी पांढरा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंढे प्रामुख्याने उपस्थित होते. या दोघांनाही आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून त्यांच्या हुद्यानुसार प्रत्येकी ४.५ लाख रुपये रोख, घरकूल आणि रोजगार-स्वयंरोजगारासाठी पोलिसांकडून मदत केली जाणार आहे.

विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात सहभाग

रामसिंग हा मूळचा अहेरी तालुक्यातील अर्कापल्ली येथील रहिवासी आहे. मार्च २००५ ला तो अहेरी दलममध्ये भरती झाला होता. त्यानंतर पेरमिली दलम आणि २०१२ ते मार्च २०२२ पर्यंत भामरागड एरिया टेक्निकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. नक्षल्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्याचे काम तो करत होता. त्याच्यावर एक खून, एक चकमक व इतर १ असे ३ गुन्हे आहेत.

तर, माधुरी ऊर्फ भुरी ही एटापल्ली तालुक्यातील गट्टेपल्ली येथील मूळची रहिवासी आहे. नोव्हेंबर २००२ ला ती कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली. त्यानंतर भामरागड दलम आणि फेब्रुवारी २०१३ ते एप्रिल २०२२ पर्यंत पेरमिली दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर खुनाचे ४ गुन्हे, चकमकीचे २१, जाळपोळीचे ७ आणि इतर ५ असे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत.

... म्हणून आत्मसमर्पणाकडे वाढला कल

सध्या नक्षल्यांचा टीसीओसी सप्ताहाचा कालावधी सुरू आहे. या कालावधीत हिंसक कारवायांसाठी नक्षली आक्रमक होत असताना दोन नक्षलींनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल दलमसाठी हा झटका आहे. शासनाची आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत झालेला नक्षलींचा खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून अनेक जहाल नक्षली आत्मसमर्पणाच्या वाटेवर आले आहेत. आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाकडून पुनर्वसन घडवून आणल्यामुळे त्यांचा आत्मसमर्पणाकडे कल वाढला असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीgadchiroli-acगडचिरोलीPoliceपोलिस