शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

आंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 17:24 IST

 चामोर्शी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजजवळील डोहात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि.२३ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

गडचिरोली -  चामोर्शी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजजवळील डोहात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि.२३ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. मात्र ही घटना सायंकाळी उघडकीस आल्यानंतर राबविलेल्या शोधमोहिमेत गुरूवारी दुपारी १२ वाजता दोन्ही मृतदेह सापडले. राकेश प्रदीप रॉय (१५) व प्रताप पंकज मंडल (१६), दोघेही रा.जयनगर अशी मृतांची नावे आहेत.जयनगर लगतच्या वैैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या चिचडोह बॅरेजमधील गेटच्या खालील भागात असलेल्या नदीपात्रात पाच किशोरवयीन मित्र बुधवारी दुपारी १२ वाजता आंघोळीसाठी गेले होते. त्यामध्ये रणेन गणेश मंडल, सुब्रत सुशांत वैैष्णव, रजनीरतन साना, राकेश प्रदीप रॉय, प्रताप पंकज मंडल आदींचा समावेश होता. आंघोळीसाठी सर्वांनी आपले कपडे, चप्पल काठावर काढून पाण्यात प्रवेश केला. पाण्याचा अंदाज घेण्याच्या प्रयत्नात दोघेजण अतिशय खोल पाण्यात गेले व बुडायला लागले. तेव्हा जवळच असलेल्या तीन मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र राकेश व प्रताप हे जास्त खोल पाण्यात गेल्याने बुडाले. 

घाबरलेल्या सोबतच्या मित्रांनी या घटनेची वाच्यता केली नाही. मात्र सायंकाळी या घटनेची कुणकुण लागल्यानंतर ६ वाजता सदर माहिती पोलीस ठाणे व तहसीलदारांना देण्यात आली. त्यानंतर चिचडोह बॅरेजचे पाणी बंद करून रात्री ९ वाजता लाईटची व्यवस्था करून रात्रभर शोधकार्य राबविण्यात आले. गुरूवारी नवीन पथक बोलावून पहाटे ५.३० वाजतापासून मार्र्कंडादेव ते घटनास्थळापर्यंत मुलांना शोधण्याचे काम सुरू होते. याकरिता बंगाली व ढिवर समाजातील मासेमारांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बोटने आणि मासे पकडण्याच्या जाळीच्या सहाय्याने शोधकार्य सुरू होते. दुपारी १२ वाजता वैैनगंगा नदीपात्रातील २५ फुट खोल पाणी असलेल्या डोहात दोन्ही मृतदेह सापडले. चामोर्शी येथे पाणबुडी उपलब्ध नसल्याने शोधकार्य लांबले. दरम्यान गुरूवारी सकाळी ९ वाजता आ.डॉ. देवराव होळी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी  तहसीलदार अरूण येरचे, नायब तहसीलदार तनगुलवार, तलाठी डी.एस.शेडमाके, कालिदास मांडवगडे, पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, प्रीतम पुजारी, श्यामराव वडेट्टीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

दुचाकी व कपड्यांवरून घटना उघडकीस पाचपैकी दोन मित्र बुडाल्यानंतर उर्वरित तिघे मित्र अर्धा तास घटनास्थळी थांबले. पण नंतर घटनेची माहिती कोणालाही न सांगता ते परत जयनगर येथे गेले. दुपारी ३ वाजता गावातीलच काही युवक आंघोळीसाठी बॅरेजमध्ये गेले असता त्यांना मृत मुलांनी नेलेली दुचाकी, त्यांचे कपडे व चपला दिसून आल्या. दुचाकी ओळखून त्या युवकांनी गावात जाऊन माहिती दिली. त्यानंतर मृतकाच्या आईने सोबत गेलेल्या एका युवकास ‘माझा मुलगा कुठे आहे?’ असे विचारल्यानंतर झालेला प्रकार उघडकीस आला.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDeathमृत्यूnewsबातम्या