शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वाहनांसह अडीच लाखांची विदेशी दारू पकडली जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 05:00 IST

जप्त केलेली दारू आणि वाहने मिळून ८ लाख ८७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.प्राप्त माहितीनुसार, होळीसाठी गोंदिया जिल्ह्यातून दारूची आयात होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदार सत्यमकुमार लोहंबरे यांच्या तक्रारीवरून दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक गौरव गावंडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : होळी आणि रंगोत्सवात न्हाऊन निघताना मद्याच्या नशेची झिंग देण्याचे स्वप्न पाहात असलेल्या दारू तस्कराला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मध्यरात्री जोरदार झटका दिला. यात विदेशी दारूच्या पेट्यांसह दोन कार जप्त करण्यात आल्या. जप्त केलेली दारू आणि वाहने मिळून ८ लाख ८७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.प्राप्त माहितीनुसार, होळीसाठी गोंदिया जिल्ह्यातून दारूची आयात होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. त्यात दोन्ही कारमधून बीअर, व्हिस्कीच्या पेट्या जप्त केल्या. त्यात रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की (किंमत १ लाख २९ हजार ६०० रुपये), इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की (७२ हजार), बीअर (३६ हजार) तसेच दोन कार (किंमत ६ लाख ५० हजार) अशी २ लाख ३७ हजारांची दारू आणि ६ लाख ५० हजारांच्या कार असा ८ लाख ८७ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.पोलीस हवालदार सत्यमकुमार लोहंबरे यांच्या तक्रारीवरून दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक गौरव गावंडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. दारुबंदी असतानाही होळी आणि रंगपंचमीनिमित्त मोठ्या प्रमाणात अवैध दारूची मागणी वाढते. त्यासाठी दारू आयात वाढल्याने पोलिसांनी गस्त वाढविली असल्याचे दिसून येते.

एका वाहनातून भरते होते दुसऱ्या वाहनात-   स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री १२.३० ते १.३० यादरम्यान कढोली जंगल परिसरातून जाणाऱ्या मार्गावर सापळा लावला. त्यात एमएमच १२, एनबी २७६५ क्रमांकाची कार आणि एमएच २७, बीई १०४३ ही दोन्ही वाहने विशिष्ट ठिय्यावर उभी होती. एका वाहनातून दारूच्या पेट्या काढून दुसऱ्या वाहनात भरल्या जात असताना एलसीबीच्या पथकाने तिथे धडक देऊन त्यांना रंगेहात पकडले. दोन्ही वाहनाच्या चालक-मालकावर गुन्हे दाखल करण्यात आले.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस