शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

बारावीत जिल्ह्याचा निकाल सरासरी 95.32 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 05:00 IST

दोन वर्षाच्या कोरोनाकाळानंतर यावर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन झाली होती. त्यामुळे निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १३ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १२ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ६११ विद्यार्थ्यांना यश मिळाले नाही. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील ‘ टर्निंग पॉईंट ’ असणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. यात गडचिरोली जिल्ह्याचा सरासरी निकाल ९५.३२ टक्के लागला आहे. नागपूर मंडळातील सहा जिल्ह्यांमध्ये हा निकाल सर्वात कमी आहे. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या श्याम सुधीर झंजाळ या विद्यार्थ्याने ९६.६७ टक्के घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. गडचिरोलीच्या शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या समीक्षा योगेंद्र धानोरकर हिने ९२.६७ टक्के गुण घेऊन मुलींमधून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या चिराग जयदेव सोरते याने ९४.६७ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा येण्याचा बहुमान पटकावला, तर याच शाळेचा प्रतीक प्रकाश मंडल हा ९४ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात गुणानुक्रमे तिसरा आला आहे.दोन वर्षाच्या कोरोनाकाळानंतर यावर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन झाली होती. त्यामुळे निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १३ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १२ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ६११ विद्यार्थ्यांना यश मिळाले नाही. 

६२ शाळांचा निकाल १०० टक्के-    जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी ६२ शाळांचा निकाल यावर्षी १०० टक्के राहिला. त्यात १० शासकीय आश्रमशाळांचा ही समावेश आहे. यावर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन असली तरी त्यांची शाळाच त्यांचे परीक्षा केंद्र होते. त्याचाही परिणाम निकालावर लागला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी टक्के म्हणजे २२.२२ टक्के निकाल एका शाळेचा लागला आहे.

श्याम म्हणतो, आयएएस व्हायचंयजिल्ह्यात सर्वप्रथम आलेल्या श्याम झंजाळ याला आधी डॉक्टर बनून नंतर आयएएसची तयारी करायची आहे. त्याला कोणतीही ट्युशन नव्हती. शाळेच्या व्यतिरिक्त तो घरी ६ ते ७ तास दररोज अभ्यास करायचा. याशिवाय त्याला खेळाची ही आवड असून तो क्रिकेट आणि स्वीमिंगला ही जातो. गिरोला येथील आश्रमशाळेवर शिक्षक असलेले त्याचे वडील, गृहिणी असलेली आई, आजी-आजोबांचे त्याला सतत प्रोत्साहन मिळत असल्याचे त्याने सांगितले.

निकालात मुली माघारल्याविशेष म्हणजे दरवर्षी गुणवत्तेत आणि एकूण निकालात मुलांच्या तुलनेत मुलीच आघाडीवर असतात. पण यावर्षी मुलांनी बाजी मारली. गुणवत्तेत जिल्ह्यातून आघाडीवर मुलेच आहेत. याशिवाय उत्तीर्ण विद्यार्थ्यात ही मुलांचे प्रमाण जास्त आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी विवेकानंद या एकाच शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात सर्वाधिक गुण घेतले आहेत. काही शाळांनी सीबीएसई बोर्ड लागू केल्याने इतर शाळांना गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळाली. काेराेना संकटामुळे मागील दाेन्ही परीक्षा ऑनलाईन पार पडल्या हाेत्या. दाेन वर्षानंतर यंदा ऑफलाईन परीक्षा झाली. शाळांचा निकाल फुगला आहे. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल