लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील पेंढरी ग्रामसभेने तिसऱ्यांदा तेंदूपत्ता लिलाव आयोजित केला होता. मात्र एकही कंत्राटदार तेंदूपत्ता लिलावाला हजर झाला नाही. त्यामुळे तेंदूपत्त्याचे संकलन अडचणीत आले आहे.पेंढरी हे गाव पेसा अंतर्गत मोडते. या ग्रामपंचायतीने स्वत:च तेंदूपत्ता संकलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तेंदूपत्ता लिलावाची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. तीनवेळा लिलाव ठेवला होता. मात्र तिसऱ्या लिलावाला कंत्राटदार उपस्थित झाले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. तेंदूपत्ता कंत्राटदार मिळत नसल्याने वन विभागाने स्वत: तेंदूपत्ता संकलन करावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. याबाबत वन विभागाचा नेमका कोणता निर्णय घेतो. याकडे गाववासीयांचे लक्ष लागले आहे. लिलावाच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुलमवार, पंचायत समिती सदस्य रोशनी पवार, सरपंच दर्शना आतला, उपसरपंच पवन येरमे, ग्रामसेवक जयंत मेश्राम, हेमंत पिलारे, भास्कर वडलकोंडावार, नंदू जनबंधू यांच्यासह पेंढरी येथील नागरिक उपस्थित होते.
पेंढरीत तेंदू संकलन अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:25 IST
तालुक्यातील पेंढरी ग्रामसभेने तिसऱ्यांदा तेंदूपत्ता लिलाव आयोजित केला होता. मात्र एकही कंत्राटदार तेंदूपत्ता लिलावाला हजर झाला नाही. त्यामुळे तेंदूपत्त्याचे संकलन अडचणीत आले आहे.
पेंढरीत तेंदू संकलन अडचणीत
ठळक मुद्देकंत्राटदार मिळेना : वन विभागाने संकलन करण्याची मागणी