शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

घराला बाहेरून कुलूप लावून दाेघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 05:00 IST

शनिवारी रात्री टेंभूरकर दाम्पत्य झोपेत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या मोटारसायकल व घराला आग लावली. आग लावण्याच्या पूर्वी टेंभूरकर यांच्या खाेलीच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावले. आगीच्या धुरामुळे काही वेळातच आग लागल्याचे लक्षात येऊन टेंभूरकर दाम्पत्य जागे झाले. त्यांनी आरडाओरड करत मदतीसाठी बाजूच्या भाडेकरूला आवाज दिले. त्यांच्या मदतीने घराची खिडकी तोडून हे दाम्पत्य कसेबसे घराबाहेर निघाले आणि त्यांनी आपला जीव वाचविला.

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : रात्रीच्या वेळी घरात झाेपलेल्यांना काेंडून बाहेरून कुलूप लावून घराला आग लावण्याचा प्रकार शुक्रवारच्या मध्यरात्री तालुक्यातील काेटगूल येथे घडला. घरातील लाेकांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न करणारी ती व्यक्ती काेण? याचा उलगडा अद्याप झाला नाही. दरम्यान या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.सदर अज्ञात व्यक्तीने घराला बाहेरून कुलूप लावून घर व बाहेरील दुचाकीला आग लावली. दरम्यान घरात झाेपलेल्यांना वेळीच जाग आल्याने त्यांनी आरडाओरड करत खिडकी ताेडून आपली सुटका केल्याने ते सुखरूप बचावले. प्राप्त माहितीनुसार, कोटगूल येथील मुख्य बाजार चौकातील बिंदियाबाई चिमनसिंग हारामी (वय ६५ वर्षे) यांच्या मालकीच्या घरी मिलिंद टेंभूरकर हे आपल्या पत्नीसह भाड्याने वास्तव्यास होते. शनिवारी रात्री टेंभूरकर दाम्पत्य झोपेत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या मोटारसायकल व घराला आग लावली. आग लावण्याच्या पूर्वी टेंभूरकर यांच्या खाेलीच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावले. आगीच्या धुरामुळे काही वेळातच आग लागल्याचे लक्षात येऊन टेंभूरकर दाम्पत्य जागे झाले. त्यांनी आरडाओरड करत मदतीसाठी बाजूच्या भाडेकरूला आवाज दिले. त्यांच्या मदतीने घराची खिडकी तोडून हे दाम्पत्य कसेबसे घराबाहेर निघाले आणि त्यांनी आपला जीव वाचविला. मात्र दुचाकी जळून खाक झाली.या आगीत घरमालकाचे अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय  भाडेकरू टेंभूरकर यांच्या घरगुती सामानासह सोने-चांदी व मोटारसायकल, तसेच रोख रक्कम पकडून अंदाजे १ लाख ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.टेंभूरकर दाम्पत्याला घरात जीवंत पेटवून मारण्याचा प्रयत्न करणारा आराेपी काेण? याचा शाेध घेण्याचे आव्हान पाेलिसांपुढे निर्माण झाले आहे. आराेपीने मनात काही तरी राग ठेवून हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गॅस सिलिंडरचाही झाला स्फाेटघराला लागलेल्या आगीची आस गॅस सिलिंडरपर्यंत पाेहाेचून सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घराची भिंत काेसळली. घरातील पूर्ण सामान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सी.आर. भंडारी व कोटगूल पोलीस मदत केंद्रातील पोलीस अधिकारी आनंद जाधव,  तलाठी, पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक, कोतवाल यांनी घटनास्थळ गाठून झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला.

 

टॅग्स :fireआगCrime Newsगुन्हेगारी