सहकार राज्यमंत्र्यांनी दिली ग्वाही : दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीचे संकेतदेसाईगंज : शेतकऱ्यांच्या सोयीसाठी देसाईगंज येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार तसेच दारूबंदीच्या जिल्ह्यात दारूचे लोट वाहत असल्याच्या मुद्यावर युती सरकार अतिशय गंभीर असल्याची ग्वाही देत दारूच्या तक्रारी आल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत राज्याचे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.स्थानिक विश्रामगृहात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विलास चावरी, खा. राहूल शेवाळे उपस्थित होते. देसाईगंज येथे मागील कित्येक वर्षापासून आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार समिती अस्तित्वात आहे. सर्वाधिक धान खरेदी विक्रीचा व्यवहार या उपसमिती मधून होत आहे. मात्र मागणी असूनही येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती तयार होण्यास राजकीय अडसर निर्माण होत आहे. राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्यास मंजूरी द्यावी, या आशयाचे निवेदन देण्यात आले. तालुकानिहाय कृषी उत्पन्न बाजार समिती बाबत सहकार मंत्रालय सकारात्मक असून येणाऱ्या काळात ही मागणी पूर्ण होण्याचे संकेत राज्यमंत्री भुसे यांनी दिले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हरिश मने, जिल्हा उपाध्यक्ष राजू अंबानी, माजी आ. रामकृष्ण मडावी, माजी जि. प. सदस्य दिगांबर मेश्राम, देसाईगंज शिवसेना तालुका प्रमुख दशरथ पिलारे, शहर प्रमुख सचिन वानखेडे, माजी शिवसेना प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, अविनाश गेडाम, नंदू चावला, बालाजी ठाकरे, विश्वास सहारे, नानु कवासे आदी उपस्थित होते. याप्रसंगी बहुसंख्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
स्वतंत्र कृउबासाठी प्रयत्न करणार
By admin | Updated: January 28, 2015 23:32 IST