लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चामोर्शी मार्गावरील कॉटन मिलजवळ रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या क्रेनला गडचिरोलीवरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यामध्ये क्रेनमध्ये आराम करत असलेला चालक जागीच ठार झाला. ही घटना गुरूवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.अनखोडा गावाजवळ एमएच ०३ एएफ ८३०० क्रमांकाची नादुरूस्त क्रेन रस्त्याच्या बाजुला उभी होती. या क्रेनच्या कॅबीनमध्ये चालक व क्लिनर झोपला होता. गडचिरोलीवरून भाजीपाल्याचे रिकामे कॅरेट घेऊन येणाऱ्या एपी ०३ टी २४६९ क्रमांकाच्या ट्रकने क्रेनला धडक दिली. क्रेनच्या कॅबीनेमध्ये झोपलेला चालक निरजकुमार अभिलाल (२८) रा. शिजीरपूर जि. अलाहाबाद (उत्तरप्रदेश) हा जागीच ठार झाला. तर क्लिनर किरकोळ जखमी झाला. क्रेनचा समोरचा भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला आहे. ट्रकचा ड्रायव्हरही किरकोळ जखमी झाला आहे. आष्टी पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार सहायक पोलीस निरिक्षक धर्मेंद्र मडावी, सखाराम बिराजदार, वैशाली कांबळे, विठ्ठल रामटेके, संजय गोंगले, अनिरूध्द कुंडगिर, पंकज राठोड, प्रदीप चौरे, गजेंद्र ढेंगळे, रत्नाकर खेकारे यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक बिराजदार करीत आहेत.
उभ्या क्रेनला ट्रकची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST
अनखोडा गावाजवळ एमएच ०३ एएफ ८३०० क्रमांकाची नादुरूस्त क्रेन रस्त्याच्या बाजुला उभी होती. या क्रेनच्या कॅबीनमध्ये चालक व क्लिनर झोपला होता. गडचिरोलीवरून भाजीपाल्याचे रिकामे कॅरेट घेऊन येणाऱ्या एपी ०३ टी २४६९ क्रमांकाच्या ट्रकने क्रेनला धडक दिली. क्रेनच्या कॅबीनेमध्ये झोपलेला चालक निरजकुमार अभिलाल (२८) रा. शिजीरपूर जि. अलाहाबाद (उत्तरप्रदेश) हा जागीच ठार झाला. तर क्लिनर किरकोळ जखमी झाला.
उभ्या क्रेनला ट्रकची धडक
ठळक मुद्देचालक जागीच ठार : कॉटन मिलजवळ पहाटेची घटना