देशाच्या स्वातंत्र्याकरिता हसता हसता फासावर लटकत हौतात्म्य पत्करलेले शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम मंगळवारी येथील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला. म्हणून यावेळी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य ए. एम. गेडाम होते. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक डी. के. खरवडे हजर होते. यावेळी शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य गेडाम यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्य व अखंडतेकरिता जीवाची आहुती देणाऱ्या वीर सुपुत्रांच्या जीवनाचा आदर्श समोर ठेवत देशभक्तीची भावना आपल्या मनात निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका गजभिये तर आभार बी. आर. सोरते यांनी केले.