शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील आदिवासींना स्त्रीभ्रूणहत्या माहीतच नाही; डॉ. प्रकाश आमटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 11:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हेमलकसात मी गेली ४५ वर्षे राहतो. तेथे बलात्काराच्या घटना अगदी कमी झाल्या आहेत. तेथील आदिवासी स्वाभिमानी आहेत. स्वत:च्या हिमतीवर जगतात. भारत सरकारने स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी मोहीम सुरू केली, तेव्हा तेथील आदिवासींना स्त्रीभ्रूण हत्या म्हणजे काय, हेच माहीत नव्हते, परंतु शहरातील लोक स्त्रीभ्रूण हत्या करतात, हे ऐकून ...

ठळक मुद्दे‘आयआयटी बॉम्बे’मध्ये व्याख्यानदीड रुपयात दिला जातो सॅनिटरी नॅपकिन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हेमलकसात मी गेली ४५ वर्षे राहतो. तेथे बलात्काराच्या घटना अगदी कमी झाल्या आहेत. तेथील आदिवासी स्वाभिमानी आहेत. स्वत:च्या हिमतीवर जगतात. भारत सरकारने स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी मोहीम सुरू केली, तेव्हा तेथील आदिवासींना स्त्रीभ्रूण हत्या म्हणजे काय, हेच माहीत नव्हते, परंतु शहरातील लोक स्त्रीभ्रूण हत्या करतात, हे ऐकून ते चकित झाले. यावरून त्यांची विचारशक्ती किती वेगळी आहे हे समजते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांनी केले.पवई येथील आयआयटी बॉम्बेमध्ये ‘अभ्युदय’ कार्यक्रमात त्यांचे व्याख्यान झाले. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी मार्गदर्शन केले. आदिवासींवर माझा एवढा विश्वास आहे की, स्वत:च्या घराला आम्ही कधीच कुलूप लावत नाही, असेही प्रकाश आमटे यांनी सांगितले.ज्येष्ठ समाजसेविका मंदाकिनी आमटे म्हणाल्या, हेमलकसामध्ये महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनचे मशिन सुरू करण्यात आले. तेथील महिलांना दीड रुपयात एक सॅनिटरी नॅपकिन दिला जातो, तसेच घरची परिस्थिती बेताची असलेल्यांना नॅपकिन मोफत दिले जातात.आदिवासींच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. स्थानिक आदिवासींची भाषा पूर्णपणे वेगळी असल्याने, त्यांची भाषा शिकण्यास सुरुवातीला अडथळे निर्माण झाले.

टॅग्स :Dr Prakash Baba Amteडॉ. प्रकाश बाबा आमटेFemale Foeticideस्त्रीभ्रूणहत्या