शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांनाही आता क्रीडा कौशल्याचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 01:24 IST

राज्याच्या आदिवासीबहुल, दुर्गम भागातील विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडाविषयक सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे क्षमता आणि कौशल्य असूनही त्यांची या क्षेत्रात प्रगती होऊ शकली नाही. मात्र आता प्रथमच आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्त्या स्थानिक स्तरावर करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

ठळक मुद्देआश्रमशाळेत क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्त्या : नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्याची आघाडी

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या आदिवासीबहुल, दुर्गम भागातील विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडाविषयक सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे क्षमता आणि कौशल्य असूनही त्यांची या क्षेत्रात प्रगती होऊ शकली नाही. मात्र आता प्रथमच आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्त्या स्थानिक स्तरावर करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या नियुक्त्या करण्यात गडचिरोली जिल्ह्याने विदर्भात आघाडी घेतली आहे.१९७२ पासून राज्यात आदिवासी आश्रमशाळा कार्यरत आहेत. आदिवासी विकास विभागाकडून संचालित ५०० पेक्षा जास्त शासकीय आश्रमशाळांवर अजूनपर्यंत क्रीडा शिक्षक किंवा क्रीडा मार्गदर्शकाचे पद मंजूर नव्हते. त्यामुळे दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासाला वाव मिळत नव्हता. ही समस्या दूर करण्यासाठी शासकीय आश्रमशाळांमध्ये क्रीडा शिक्षक किंवा मार्गदर्शक हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय यावर्षी राज्य शासनाने घेतला. त्यानुसार ६ मार्च २०१८ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये कंत्राटी क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्तीसाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. जिल्हाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी अध्यक्ष असलेल्या या समितीत जिल्हा क्रीडा अधिकारी आणि संबंधित प्रकल्प अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून आहेत.गडचिरोली जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोली आणि अहेरीचे प्रकल्प अधिकारी असलेल्या डॉ.सचिन ओम्बासे यांनी क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्तीची प्रक्रिया करण्यात आघाडी घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी आणि भामरागड या तीन प्रकल्पांमधील ४३ पैकी ४१ शासकीय आश्रमशाळांमध्ये क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्तीचे आदेश तयार झालेआहे. मासिक २५ हजार रुपये मानधनावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असून गुरूवार दि.६ सप्टेंबरपासून ते क्रीडा मार्गदर्शक संबंधित आश्रमशाळांमध्ये रुजू होत आहे. तत्पूर्वी त्यांना २७ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर यादरम्यान गडचिरोली येथे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण देण्यात आले.खासगी शाळांमधील विद्यार्थी वंचितराज्यात जवळपास साडेपाचशे खासगी अनुदानित आश्रमशाळा आहेत. त्या आश्रमशाळांवर अद्यापही क्रीडा मार्गदर्शकाचे पद मंजूर नाही. त्यामुळे त्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना आपले क्रीडा कौशल्य दाखवण्याच्या संधीपासून वंचित राहावे लागत आहे. शासकीय आश्रमशाळांप्रमाणेच खासगी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठीही क्रीडा मार्गदर्शकाच्या नियुक्तीस मान्यता दिल्यास त्यांच्यातूनही राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू उदयास येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी