शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पावसाळ्यानंतर वृक्ष लागवड

By admin | Updated: September 8, 2015 03:41 IST

शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला २०१५-१६ या वर्षात ३४ लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट

गडचिरोली : शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला २०१५-१६ या वर्षात ३४ लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अर्धा पावसाळा संपल्यानंतर उद्दिष्ट देण्यात आले आहे. यावर्षी जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण कसे करावे, असा प्रश्न विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांसमोर पडला आहे. जंगलाचे प्रमाण कमी होत चालले असल्याने पर्यावरण असंतुलित होण्याचा धोका मागील काही दिवसांपासून वाढला आहे. वृक्ष लागवड करून ती जगविणे हाच एकमेव पर्याय असल्याचे लक्षात आल्यानंतर आघाडी शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत संपूर्ण राज्यात १०० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जात होते. आघाडी शासनाच्या कालावधीत हे उद्दिष्ट पर्यावरण दिनाच्या पूर्वीच दिले जात होते. मात्र सध्या सत्तेत असलेल्या भाजपा शासनाने सदर योजना सुरू ठेवावी की बंद करावी या पेचात सापडली होती. त्यामुळे पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी यावर कोणताही निर्णय झाला नाही. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मा पाऊस पडला. जलसाठ्यांमध्ये १० ते १५ टक्के पाणी शिल्लक आहे. सदर जलसाठा डिसेंबर महिन्याच्या अंती संपुष्टात येणार आहे. मानवासाठी पाणी मिळणार नाही. त्यातच वृक्षांसाठी पाणी कुठून आणणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. वृक्ष लागवडीचा आढावा दरवर्षी घेतला जातो. त्यामुळे वृक्षांची लागवड न झाल्यास संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. उशीरा उद्दिष्ट प्राप्त झाल्याने प्रशासनसुध्दा पेचात सापडले आहे. (नगर प्रतिनिधी)कोरड्या दुष्काळाने अडचण वाढलीजिल्ह्यात यावर्षी ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. २४ आॅगस्ट रोजी जिल्ह्याला शतकोटी वृक्ष लागवड योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले. जेव्हापासून उद्दिष्ट मिळाले, तेव्हापासून जिल्ह्यात थेंबभरही पाऊस पडला नाही. दिवसभर कडाक्याची ऊन पडत असल्याने रोवलेले धान पीक कसे जगवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. संपूर्ण जिल्हाभरात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत वृक्ष लागवड करणार कोण व ते जगवायचे कसे असा प्रश्न निर्माण होत आहे. केवळ एक लाख रोपट्यांची निर्मिती४रोपट्यांची निर्मिती करण्याचे काम गडचिरोली जिल्ह्यात सोनापूर, वाकडी, कृष्णनगर, रामगड, कसनसूर या पाच ठिकाणच्या शासकीय रोपवाटीकांमध्ये केले जाते. या पाचही रोपवाटीकांनी यावर्षी केवळ १ लाख ३ हजार १०७ वृक्ष निर्माण केल्या आहेत. यातील बहुतांश वृक्ष १५ आॅगस्ट रोजी शाळांनी लावली आहेत. काही वृक्ष नागरिक स्वत: खरेदी करून लावतात. त्यामुळे शासकीय रोपवाटीकांमध्येही रोपटे मिळणे कठीण होणार आहे.आॅक्टोबरमध्ये २१ टक्केच वृक्ष जिवंत४याच योजनेंतर्गत २०१२-१३ मध्ये १२ लाख ५५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. लागवड झालेल्या वृक्षांची आॅक्टोबर २०१४-१५ मध्ये पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान केवळ २ लाख ६५ हजार वृक्ष जिवंत असल्याचे आढळून आले. एका वर्षाच्या कालावधीत सुमारे १० लाख झाडे मरण पावली. त्यानंतरही किती झाडे जगली, हा प्रश्नच आहे.