शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

वृक्ष लागवडीला विलंब

By admin | Updated: July 27, 2014 00:05 IST

शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला यंदा ८३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. यासाठी कृषी, वन विभाग, सामाजिक वनीकरण यासह अन्य विभागाने तयारी केली आहे.

शतकोटी योजना : जिल्ह्याचे उद्दिष्ट राहणार अपूर्णदिलीप दहेलकर - गडचिरोलीशतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला यंदा ८३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. यासाठी कृषी, वन विभाग, सामाजिक वनीकरण यासह अन्य विभागाने तयारी केली आहे. मात्र यंदा जिल्ह्यात पावसाने उशिरा हजेरी लावली. पाच-सहा दिवसापूर्वी जिल्ह्यात संततधार पाऊस बरसला. अनेक विभागाने खड्डे खोदण्याची कारवाई सुरू केली आहे. मात्र पावसाला उशीर झाल्याने वृक्ष लागवडीला विलंब होत आहे. यामुळे यंदा जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट अपूर्ण राहण्याचे चिन्ह आहे.वातावरणातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षाची आवश्यकता आहे. आधुनिक विभाग ग्लोबल वार्मिंगमुळे तर निसर्गंच बदलत आहे. या पार्श्वभूमीवर शतकोटी वृक्ष लागवड योजना महत्वाची आहे. यासाठी शासननाचे विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था यांच्यात मार्फतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शतकोटी वृक्ष लागवड योजना अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. राज्य शासनाच्या २० कलमी कार्यक्रमांतर्गत गेल्या चार-पाच वर्षांपासून जिल्ह्यात वनविभाग, महाराष्ट्र वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद व इतर विभागांना दरवर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिल्या जाते. यासाठी राज्य शासनाचा लाखो रूपयाचा खर्च होतो. यंदा गडचिरोली जिल्ह्याला या योजनेंतर्गत ८३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यापैकी एकट्या वनलविभागाला ६० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्या खालोखाल सामाजिक वनीकरण, एफडीसी, कृषी विभाग, बांधकाम, पाटबंधारे व इतर विभागांना वृक्ष लागवड करावयाची आहे. वृक्ष लागवडीसाठी या सर्व विभागाने खड्डे खोदण्याच्या कारवाईला सुरूवात केली आहे. वनविभागाला वृक्ष लागवडीसाठी १५ लाख ३ हजार ३०, सामाजिक वनीकरणाला ३७ हजार, आरडीडी व जिल्हा परिषदेला मिळून ४ लाख ६९ हजार ६८५ तसेच इतर विभागाला ४ हजार खड्डे खोदण्याचे उद्दीष्ट आहे. यापैकी वन विभागाचे सद्यस्थितीत १३ लाख ११ हजार ४३० तर इतर विभागाचे ३ हजार ४७९ आरडीडी व जिल्हा परिषद मिळून २ लाख ७९ हजार २५७ आणि सामाजिक वनीकरण विभागाचे २२ हजार ५१६ खड्डे खोदून झाले आहेत. जिल्ह्यात पाऊस उशीरा बरसल्यामुळे या विभागांना खड्डे खोदण्यासाठी विलंब झाला. चार-पाच दिवसानंतर जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळला. चार-पाच दिवस पाऊस सुरूच असल्याने या कालावधीत या विभागांना खड्डे खोदण्याचे काम करता आले नाही. त्यामुळे या सर्व विभागाने आता खड्डे खोदण्याच्या कामाला वेग दिला आहे. मात्र खड्डे खोदण्याचे कामही विलंबाने होत आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीचे १०० टक्के उद्दिष्ट गाठणे कठीण आहे. वन विभागासह अन्य विभागाचे बरेच खड्डे खोदणे शिल्लक असल्याची माहिती आहे. सध्या जिल्ह्यात रोवणीचा हंगाम जोमात सुरू आहे. त्यामुळे खड्डे खोदण्यासाठी या विभागांना पुरेसे मजूर मिळत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या सर्व विभागाने दोन महिन्यापूर्वीच वृक्ष लागवडीचे नियोजन केले मात्र पावसाच्या लपंडावामुळे नियोजन अयशस्वी झाले आहे.