शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

झाडे समाज बांधवांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:22 IST

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात झाडे (झाड्या, झाडीया) जमातीच्या लोकांची लोकसंख्या मोठी आहे. मात्र जात व जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या समाज बांधवांना मोठी कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देजात व वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी : २२ पर्यंत चालणार दोन जिल्ह्यातील समाज बांधवांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात झाडे (झाड्या, झाडीया) जमातीच्या लोकांची लोकसंख्या मोठी आहे. मात्र जात व जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या समाज बांधवांना मोठी कसरत करावी लागत आहे. शासनाने सदर समाजाच्या संशोधनासाठी समिती गठित करून प्रशासनामार्फत जात व जात वैधता प्रमाणपत्र देणे सुरू करावे, या मागणीसाठी दोन्ही जिल्ह्यातील झाडे जमातीच्या बांधवांनी १३ जूनपासून येथील गांधी वार्डाच्या चौकातील जुन्या जयस्तंभाच्या जागेवर धरणे आंदोलन सुरू केले आहे.या संदर्भात चंद्रपूर-गडचिरोली झाडे, झाड्या तसेच झाडीया जमात समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत झाडे, झाड्या, झाडीया जमातीचे सखोल अध्ययन झाले नाही. अध्ययन करण्यासाठी एक समिती गठीत करावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात झाडे नावाने जी जमात आहे, ती शासनाने भटक्या जमातीमध्ये अनुक्रमांक २९ ची धनगर या मुक्त जातीची तत्सम जात म्हणून १५ क्रमांकावर समाविष्ट केली आहे. मात्र जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न कायम आहे. या संदर्भात शासनस्तरावर कोणता निर्णय झाला आहे, याबाबत या जमातीचे लोक अनभिज्ञ आहेत. जात व वैधता प्रमाणपत्राअभावी झाडे, झाड्या जमातीचे लोक विविध शासकीय योजनांपासून वंचित आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.धरणे आंदोलनात जमात समितीचे अध्यक्ष अनिल मंटकवार, जिल्हा सचिव पुरूषोत्तम अर्कपटलवार, अभ्यासक डॉ. सुशीलकुमार कोहाड, यमाजी तुनकलवार, सखाराम दिवटीवार, रमेश तुनकलवार, जयेंद्र बर्लावार, कमलाकर कोमलवार, किशोर येनमुले, पुंडलिक चौधरी यांच्यासह समाज बांधव सहभागी झाले आहेत.अनेक गावातील बांधव सहभागीचंद्रपूर-गडचिरोली झाडे, झाड्या व झाडीया जमात समितीच्या वतीने १३ जून बुधवारपासून गांधी चौकातील जुन्या जयस्तंभाजवळ धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सदर आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील शेकडो समाज बांधव सहभागी झाले आहे. १३ जून रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील खेडी, उसेगाव, केरोडा, व्याहाड, उपरी, जाम, भटेजाम, सावली येथील समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले. गुरूवारी गडचिरोली जिल्ह्यातील मौशीखांब, नवेगाव, राखी, गुरवळा, विहीरगाव तर शुक्रवारी साखेरा, कारवाफा, झरी, जांभळी, राजोली, मारोडा, गिलगाव, मारकबोडी, डोंगरगाव, भाडभिडी, कुरूड आदी गावातील समाज बांधव आंदोलनात सहभागी होणार आहे. समितीच्या वतीने ठरवून दिलेल्या दिवसानिहाय दोन्ही जिल्ह्यातील समाज बांधव या आंदोलनात टप्याटप्याने सक्रीय सहभाग नोंदविणार आहेत.