शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला विशेष अधिकार द्यावे; सरपंच संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 14:55 IST

Gadchiroli : सीईओंमार्फत शासनाला पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील विविध समस्या तसेच गावाच्या विकासासंदर्भात विविध मागण्या तसेच सरपंच व उपसरपंच यांच्या समस्या लवकर मार्गी लावाव्यात. सदर मागण्या लवकर निकाली न काढल्यास १६ ऑगस्टपासून ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय सरपंच परिषदेने दिला.

सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सरपंचांनी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांना बुधवारी निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.

निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने रद्द केलेले १५ लाख रुपयांपर्यंतचे काम ग्रामपंचायतींनी न करण्याचे अधिकार शासन निर्णय काढून पूर्ववत करावे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने सुप्रीम कोर्टात प्रगती आणावी. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात यावी, आमदार, खासदारांप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक विकास निधी उभा करून सरपंचांना १० लाख रुपयांपर्यंतची कामे करण्याचे अधिकार प्रदान करावे. ग्रामपंचायत स्तरावरीत सर्व समित्यांचे अध्यक्षपद सरपंच यांना बहाल करावे. स्थानिक स्वराज्य संस्था या क्षेत्रातून सरपंच प्रतिनिधींसाठी दोन जागा राखीव कराव्यात.

निवेदन देताना अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर, सरपंच विलास उसेंडी, सरपंच विलास बावणे, तसेच राजेश लिंगायत, सतीश गुरनुले, प्रियंका कुमरे, रत्नमाला सेलोटे, शिल्पा कोल्हे, अनिता पदा, अविनाश कन्नाके, तुषार मडावी, विनोद मल्लेवार उपस्थित होते.

ग्रा. पं. परिक्षेत्रातील कामांचे अधिकार द्यावेरेतीघाट असलेल्या ग्रामपंचायतींना घाट लिलाव करण्याचे अधिकार बहाल करावे. गौणखनिज व मुद्रांक शुल्क नियमित ग्रामपंचायतींना वितरित करण्यात यावे, नागरी सुविधा, जनसुविधा, ठक्कर बाप्पा योजना व दलितवस्ती सुधार योजनेची कामे ग्रामपंचायतींनी सादर केलेल्या कृती आराखड्यानुसार ग्रामपंचायतीला देण्यात यावे, ग्रामपंचायतीच्या परिक्षेत्रात केल्या जाणाऱ्या विकासकामाला ग्रामपंचायतीला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार प्रदान करावे. सरपंच, उपसरपंच यांना शासकीय कामाकरिता बस प्रवास मोफत द्यावा.

जिल्हास्तरावर सरपंच भवन निर्माण करावेवर्षातून दोन वेळा रेल्वे प्रवास, मंत्रालयात जाण्याकरिता मोफत करावा. जिल्हास्तरावर सरपंच भवन निर्माण करावे, मोदी आवास योजनेचे देयके त्वरित देण्यात यावे. या व इतर अनेक मागण्यांचा समावेश असलेले निवेदन सरपंच परिषदेच्या वतीने देण्यात आले. सदर मागण्यांचा विचार न केल्यास १६ ऑगस्टपासून सर्व सरपंच ग्रामपंचायतीला टाळे लावून बेमुदत बंद पाळला जाईल, असा इशारा देण्यात आला. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीgram panchayatग्राम पंचायत