शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत मालवाहू ऑटोला टिप्परची धडक; दोन ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 21:08 IST

आल्लापल्लीकडून चंद्रपूरच्या दिशेने जात असलेल्या टिप्परने (एएम १३, सीयू ०४२०) जोरदार धडक दिली. यात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथून ७ किलोमीटवर असलेल्या तानबोडी फाट्याजवळ चंद्रपूरकडून शितपेये घेऊन येणाऱ्या मालवाहू ऑटोला आल्लापल्लीकडून चंद्रपूरच्या दिशेने जात असलेल्या टिप्परने (एएम १३, सीयू ०४२०) जोरदार धडक दिली. यात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात ५ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला.ही धडक इतकी जबरदस्त होती की ऑटोमध्ये बसलेल्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले. तसेच नवीन असलेल्या ऑटोचेही तुकडे झाले. मृतांमध्ये अमरिश रामचंद्र पांढरे (४०) आणि दुसऱ्या व्यक्तीचे नाव पिंटू (३५) असल्याचे समजले. ते दोघेही चंद्रपूर येथील रहिवासी होत. गंभीर जखमी असलेल्या तिसऱ्या व्यक्तीचे नाव कळू शकले नाही, पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने समजते.अपघाताची माहिती मिळताच प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील मोटार परिवहन विभागाचे उपनिरीक्षक सुधाकर कुमरे यांनी चमूसह घटनास्थळ गाठले आणि क्रेन पाठवून वाहने व मृतदेह काढले. अधिक तपास पो.निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वात एपीआय बाळासाहेब शिंदे, पीएसआय विनायक दडस करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात